Bank Holidays in August 2022: ऑगस्ट महिन्यातच बँकेंची कामं उरका, 11 दिवस बँका राहणार बंद; पाहा यादी

Bank Holidays in August 2022: ऑगस्ट महिन्यातच बँकेंची कामं उरका, 11 दिवस बँका राहणार बंद; पाहा यादी

ऑगस्ट महिना म्हटले की सर्वांनाच आनंद होतो. कारण या महिन्यात अनेक सुट्ट्या आपल्याला मिळतात. तसेच या महिन्यात बँकांनाही भरपूर सुट्ट्या असतात. तर या बँकांच्या सुट्टयांच्या अगोदर आपल्याला सर्व कामं पूर्ण करावी लागतात. याच पार्श्वभूमीवर भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) ऑगस्ट महिन्यांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ऑगस्ट (August) महिना म्हटले की सर्वांनाच आनंद होतो. कारण या महिन्यात अनेक सुट्ट्या आपल्याला मिळतात. तसेच या महिन्यात बँकांनाही (Bank) भरपूर सुट्ट्या असतात. तर या बँकांच्या सुट्टयांच्या अगोदर आपल्याला सर्व कामं पूर्ण करावी लागतात. याच पार्श्वभूमीवर भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) ऑगस्ट महिन्यांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे.

ऑगस्टमध्ये तब्बल ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. पुढील महिन्यात स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी यासारखे महत्त्वाचे सण आहेत. यामुळे ही यादी पाहून वेळेतच तुम्ही तुमची कामं उरकून घ्या. मात्र बँकांची कामं ऑनलाइनही सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरु करा.

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी :

७ ऑगस्ट : पहिला रविवार (साप्ताहिक सुट्टी)

९ ऑगस्ट : मोहरम

११ ऑगस्ट : रक्षाबंधन (देशभरात सुट्टी)

१३ ऑगस्ट : दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)

१४ ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

१५ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन

१६ ऑगस्ट : पारशी नववर्ष

१८ ऑगस्ट : जन्माष्टमी (देशभर सुट्टी)

२१ ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

२८ ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

३१ ऑगस्ट : गणेश चतुर्थी

Bank Holidays in August 2022: ऑगस्ट महिन्यातच बँकेंची कामं उरका, 11 दिवस बँका राहणार बंद; पाहा यादी
India House : 2024 ऑलिंपिकसाठी पॅरिसमध्ये उभे राहणार ‘इंडिया हाऊस’
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com