Tea
TeaTeam Lokshahi

जेवणानंतर चहा पिण्याची सवय टाळा ; नाहीतर....

जर तुम्हीही चहाच्या प्रेमींपैकी एक असाल आणि सकाळी उठल्यानंतर आणि दिवसभरात प्रत्येक जेवणानंतर एक कप चहा प्याल तर ही सवय लगेच बदला. जेवणानंतर चहा पिण्याची तुमची हि सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. खरं तर चहामध्ये कॅफिन असते. जे शरीरात कॉर्टिसॉल किंवा स्टेरॉइड हार्मोन वाढवते. त्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर जाणून घेऊयात की जेवल्यानंतर चहा पिल्याने आरोग्याला नक्की काय नुकसान असतात.
Published by :
Published on

रक्तदाब वाढतो
जे लोक जेवणानंतर चहा पितात त्यांना उच्च रक्तदाब असू शकतो. चहामध्ये कॅफिनचे अधिक प्रमाण असते. त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. जर तुम्ही आधीच उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर जेवणानंतर चहा पिऊ नका.

हृदयासाठी हानिकारक
जेवल्यानंतर लगेच चहा प्यायल्यास ही सवय लगेच सोडा. या सवयीमुळे तुमचे हृदय आजारी पडू शकते. असे केल्याने हृदयाचे ठोकेही वेगवान होतात.

पचनसंस्थेच्या समस्या वाढतात
अन्न खाल्ल्यानंतर लगेच चहा प्यायल्याने शरीराची पचनक्रिया कमकुवत होत अन्नाचे पचनही व्यवस्थित होत नाही. इतकंच नव्हे तर त्यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्त्वंही मिळत नाहीत. चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने माणसाला गॅस, अॅसिडिटीचा त्रास जास्त प्रमाणात होऊ लागतो.

डोकेदुखीचे कारण
जेवणानंतर चहा पिल्यास डोकेदुखीला सामोरं जावं लागेल. खरं तर जेवल्यानंतर लगेच चहा प्यायल्याने शरीरात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ लागतात. शरीरात गॅस तयार झाल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

लोह कमतरता
जेवणानंतर चहा प्यायल्याने शरीरात लोहाची कमतरता देखील होऊ शकते. चहा प्यायल्याने शरीर प्रथिनांसह आवश्यक पोषक द्रव्ये शोषू शकत नाही. ज्यामुळे लोह किंवा रक्ताची कमतरता सुरू होते. चहामध्ये आढळणारे फिनोलिक कंपाऊंड लोहाच्या शोषणात व्यत्यय आणतात. त्यामुळे अॅनिमियाची समस्या देखील उद्भवू शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com