Bank New Rules : 1 एप्रिलपासून बँकांच्या नियमात होणार मोठे बदल, जाणून घ्या.
1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षांची सुरुवात होते. अशातच आता बँकेचे बदललेले नियम समोर आले आहेत. नवीन नियमांची अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून करणार आहेत. हे बदल नक्की कोणते आहेत? त्याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
ATM मधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम :
एटीएममधून विनाशुल्क पैसे काढण्याच्या संख्येत बदल करण्यात आला आहे. ग्राहक आता केवळ तीन वेळा दुसऱ्या बँकांच्या एटीएममधून मोफत पैसे काढू शकतात. नंतरच्या प्रत्येक व्यवहारावर 20 ते 25 % शुल्क आकरण्यात येणार आहे.
डिजिटल बँकिंगचे नवीन फीचर्स :
डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन मिळावे यासाठी बँका नवीन सुविधा ग्राहकांना देत असते. आता ऑनलाइन बँकिंगद्वारे चांगल्या सेवा देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे आता AI Chatbox आणणार आहे. डिजिटल व्यवहारांना सुरक्षित करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेनटिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत.
किमान रक्कम नियम :
बँकांमध्ये किमान शिल्लक रक्कम किती असावी? या संदर्भात नवीन नियम आणले आहेत. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील शाखेतील खातं यावर अवलंबून असेल. किमान शिल्लक रकमेपेक्षा कमी रक्कम शिल्लक खात्यात राहिल्यास दंड आकरला जातो.
बचत खाते आणि मुदत ठेवीच्या व्याज दरात बदल :
बँका बचत खाते आणि मुदत ठेव खात्यांच्या नियमात बदल करण्यात आला आहे. बचत खात्याचे व्याज हे आता खात्यातील शिल्लक रकमेवर अवलंबून असणार आहे. जर खात्यात अधिक रक्कम असेल तर तर अधिक परतावा मिळेल.
क्रेडिट कार्डचे फायदे :
State bank of India आणि IDFC First बँक सह इतर मोठ्या बँका त्यांच्या को ब्रँड विस्तारा क्रेडिट कार्डसच्या फायद्यांमध्ये बदल होणार आहेत. आता या कार्ड्सवर मिळणाऱ्या टिकर व्हाऊचर, रिन्यूअलवर मिळणार फायदे, रिवॉर्डस सारखे फायदे बंद केले जाणार आहेत. अॅक्सिस बँकच्या विस्तारा क्रेडिट कार्ड्सचे फायदे 18 एप्रिलपासून बदलणार आहेत.