Benefits Of Carrots
Benefits Of CarrotsTeam Lokshahi

Benefits Of Carrots : गाजराचे 'हे' आर्श्चयकारक फायदे तुम्हाला माहितीयेत का?

जवळपास सर्व ऋतुमध्ये सहज उपलब्ध होणारं कंदमुळ म्हणजे गाजर .
Published by :
shamal ghanekar

जवळपास सर्व ऋतुमध्ये सहज उपलब्ध होणारं कंदमुळ म्हणजे गाजर (Carrots) . केशरी आणि रसाळ गाजर आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठीही अनेक फायदे देतात. हे जेवढे चवीला स्वादिष्टच आहे तेवढेच त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन (Vitamins) के अशा अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांचा समावेश आहे.

रोज एक गाजर खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. नुसतं गाजर रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढता.

Benefits Of Carrots
Benefits of coriander leaves : कोथींबीर सेवन केल्याने होतात 'हे' फायदे

गाजर डोळ्यांसाठी चांगले असतात कारण त्यात कॅरोटीनोइड्स किंवा व्हिटॅमिन ए असते, जे केवळ डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

वजन कमी करण्यासाठी गाजर किंवा गाजर रस यांचा प्यायल्याने तुम्हाला त्याचा फायदा होईल. यामुळे कमी कॅलरीजचे (Calorie) सेवन होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

गाजर अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. गाजराचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

गाजरामध्ये भरपूर प्रमाणात असलेले व्हिटॅमिन ए शरीरातील विषारी पदार्थ काढण्यासाठी मदत करते आणि यकृतामध्ये चरबी आणि पित्त जमा होण्यास प्रतिबंध करते.

गाजरांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते जे पचन प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

महिलांसाठीही गाजराचे अनेक फायदे आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे मासिक पाळीच्या समस्यांशी सामना करणे. ज्या महिलांची मासिक पाळी अनियमित आहे किंवा ज्यांना जास्त रक्तस्त्राव होतो, त्यांनी त्यांच्या रोजच्या आहारात गाजराचा समावेश केल्यास खूप फायदा होतो.

गाजर आणि गाजराचा रस केसगळतीच्या समस्यांशी लढण्यासाठी उत्तम आहे कारण ते केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करतात. गाजरमध्ये विविध जीवनसत्त्वे असल्यामुळे ते फायदेशीर ठरते.

Benefits Of Carrots
Health Benefits of Garlic : लसणीचे सेवन केल्याने होतात अनेक फायदे
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com