Health
HealthLokshahi Team

असं काही जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा घ्या सल्ला; नाहीतर...

Cancer : स्वादुपिंडाचा कर्करोग काय असतो
Published by :

आपल्या दैनंदिन जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे नेहमी लक्ष देणे व आरोग्याची काळजी घेणे अगदी महत्वाचे ठरते. (Helth) स्वादुपिंड हा पोटाचा एक महत्त्वाचा भाग आहे. लहान आतड्याजवळ ही एक लांबलचक ग्रंथी आहे. हे पचन आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. अशा परिस्थितीत स्वादुपिंड (liver)सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पोटात आणि आजूबाजूला कोणतीही लक्षणे दिसली तर ते कर्करोगाचे (cancer)लक्षण असू शकते. चला जाणून घेऊया शरीरात दिसणारी काही लक्षणे जी स्वादुपिंडाचा कर्करोग दर्शवू शकतात.

Health
वेळेवर झोप लागत नाही ? जाणून घ्या उपाय
  • पोटात दुखत राहिल्यास स्वादुपिंडात कोणत्याही प्रकारचा त्रास होण्याची शक्यता असते. स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे देखील पोटदुखी होऊ शकते.

  • मळमळ आणि उलट्या देखील स्वादुपिंडात कर्करोग दर्शवू शकतात. तुम्हाला सतत अस्पष्ट मळमळ आणि उलट्या होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • कोणत्याही कारणाशिवाय नेहमी ताप येणे हे स्वादुपिंडाला कारणीभूत ठरू शकते. तसेच यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ आणि रक्तसंचय होते.

  • डोळे आणि त्वचा पिवळसर होणे आणि लघवीचा गडद रंग देखील स्वादुपिंडातील गंभीर समस्या दर्शवू शकतो.

  • उच्च रक्तदाब स्वादुपिंडाचा दाह दर्शवू शकतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष करू नका

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com