FATF  : FATF ची मोठी कारवाई! या देशांना टाकलं ब्लॅक लिस्टमध्ये...

FATF : FATF ची मोठी कारवाई! या देशांना टाकलं ब्लॅक लिस्टमध्ये...

जागतिक स्तरावरील दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रींगवर नजर ठेवणारी संस्था FATF ने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. यामध्ये त्यांनी उत्तर कोरिया, इराण आणि म्यानमार या देशांना अद्याप देखील जोखिम असणारे देश म्हटलं आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • FATF ची मोठी कारवाई

  • इराण, उत्तर कोरिया, पाकिस्तानसह अनेक देश ब्लॅक लिस्टमध्ये

  • पाकिस्तानला FATF चा कडक इशारा

जागतिक स्तरावरील दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रींगवर नजर ठेवणारी संस्था FATF ने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. यामध्ये त्यांनी उत्तर कोरिया, इराण आणि म्यानमार या देशांना अद्याप देखील जोखिम असणारे देश म्हटलं आहे. कारण हे देश दहशतवादाला फंडिंग अन् मनी लॉन्ड्रींग विरोधी कायदे करण्यात अयशस्वी ठरले आहेत. जागतिक दहशतवाद आणि मनी लॉंडरिंग विरोधी संस्था FATF ने एक मोठी कारवाई केली आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे. यामध्ये उत्तर कोरियात, इराण, म्यानमार हे देश ग्रे लिस्टमध्येच आहेत.

त्यामुळे हे देश जागतिक पातळीवर धोक्याचे ठरत आहेत. त्यामुळे या देशांना ब्लॅक लिस्टमधून काढलं जावू शकत नाही. आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांनी त्यांच्यापासून सावध रहावे. या देशांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे की, आता आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांनी त्यांना मर्यादित कर्ज आणि आर्थिक सहाय्यता द्यावी. या देशांवर जेणेकरून FATF नियमांना पाळण्याचा दबाव निर्माण होईल.

इराण, म्यानमार, उत्तर कोरिया, हे देश ब्लॅक लिस्टमध्येच राहतील असे म्हटले आहे. FATF च्या मते, हे देश केवळ दहशतवाद आणि मनी लॉंडरिंग विरोधी कायदे लागू करण्यात अपयशी ठरले आहेत. तसेच जागतिक आर्थिक व्यवस्थेलाही या देशांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.

या देशांच्या प्रगतीचा घेतला आढावा

FATF ने २०२५ मध्ये अनेक देशांच्या प्रगतीचा आणि इतर काही पैलूंचा अभ्यास केला. यावरुन त्यांनी, अल्जेरिया, अंगोला, बल्गेरिया, बुर्किना फासो, कॅमेरुन, कोट’डी आयव्होअर, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो, केनिया, लाओ पीडीआर, मोनाको, मोझांबिक, नामिबिया, नेपाळ, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण सुदान, सीरिया, व्हेनेझुएला आणि व्हिएतनाम यासह अनेक देशांच्या प्रगतीचा आढावा घेतला. हे देश देखील अद्यापही ग्रे लिस्टमध्ये आहेत.

हे देश ग्रे लिस्टमधून बाहेर

बुर्किना फासो, मोझांबिक, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका यांना या ब्लॅक लिस्टमधून,काढून टाकण्यात आले आहे. FATF ने या देशांना म्हटले आहे की, ब्लॅक लिस्टमधून काढून टाकण्यात आले याचा अर्थ तुम्हाला दहशतवादाला कोणत्याही प्रकारचा निधी देण्याची, मदत करण्याची मुभा नाही. हा इशारा केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर ब्लॅक लिस्टमधील दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांनाही देण्यात आला आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. FATF च्या ग्रे लिस्टमधून कोणत्या देशांना काढून टाकण्यात आले आहे?

बुर्किना फासो, मोझांबिक, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना, तसेच २०२२ मध्ये पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून काढून टाकण्यात आले आहे.

प्रश्न २. FATF ने पाकिस्तानला काय इशारा दिला आहे?

FATF ने पाकिस्तानला म्हटले आहे की, त्यांना ग्रे लिस्टमधून काढून टाकल्याचा अर्थ असा नाही की, ते दहशतवादाला किंवा दहशतवाद्यांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देतील. त्यांच्यावर FATF बारकाईने लक्ष ठेवून आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com