31 July Deadline : आजच करुन घ्या 'ही' महत्त्वाची कामं; पाहा यादी

31 July Deadline : आजच करुन घ्या 'ही' महत्त्वाची कामं; पाहा यादी

आज 31 जुलै आहे, महिन्याचा शेवटचा दिवस. जी काही महत्वाची काम तुमची राहीली असतील तर ती आजच करुन घ्या. कारण आज अनेक आर्थिक कामांसाठीची मुदत संपत आहे. नाहीतर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल शिवाय दंडही भरावा लागणार आहे. काय आहेत ही महत्वाची काम तर पाहा
Published by :
Team Lokshahi

आज 31 जुलै आहे, महिन्याचा शेवटचा दिवस. जी काही महत्वाची काम तुमची राहीली असतील तर ती आजच करुन घ्या. कारण आज अनेक आर्थिक कामांसाठीची मुदत संपत आहे. नाहीतर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल शिवाय दंडही भरावा लागणार आहे. काय आहेत ही महत्वाची काम तर पाहा

आयटी रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख

आयकर परतावा. आज 31 जुलै रोजी आयकर परतावा दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही अंतिम मुदतीपर्यंत ITR दाखल करू शकत नसाल, तर तुम्हाला ITR उशिरा दाखल करताना दंड भरावा लागेल.

रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक

रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची 31जूलै ही शेवटची तारीख आहे. सरकारच्या तीन मोफत सिंलेडर मिळण्याच्या योजनेचा लाभ मिळण्याची आज शेवटची तारीख आहे. उत्तराखंडच्या लोकांना ह्या मोफत सिलेंडरचा लाभ घेता येईल

इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी मिळवण्याची शेवटची संधी

इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी मिळवण्याची आज शेवटची संधी देण्यात आली आहे. गोवा सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी देण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिलेली होती. गोवा सरकारकडून 31 जुलैपर्यंत इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीवर तीन लाख रुपयांपर्यंतची सबसिडी देण्यात येत आहे.

पीएम किसान योजनेसाठी E-KYC भरण्याची अंतिम मुदत

पीएम किसान योजनेसाठी E-KYC (PM Kisan Scheme E-KYC) भरण्यासाठीही आज अंतिम तारीख आहे. त्यामुळं ज्या लाभार्थ्यांनी 31 आपली ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांना ती 31 जुलैच्या आत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com