Bombay Masala Sandwich
Bombay Masala SandwichTeam Lokshahi

Bombay Masala Sandwich Recipe: चहासोबत बनवा चविष्ट बॉम्बे मसाला सँडविच

बॉम्बेचे स्ट्रीट फूड (street food) सर्वत्र प्रसिद्ध आहे. वडा पावनंतर (vada pav ) मुंबईचे सँडविच खायला सगळ्यांनाच आवडते. हे सहज बनणारे सँडविच (sandwich) चहासोबत मस्त लागतात. हे सँडविच तुम्ही घरीही बनवून पाहू शकता. जर तुम्हाला संध्याकाळच्या चहासोबत काही झटपट बनवून खायचे असेल तर तुम्ही हे बॉम्बे मसाला सँडविच (Bombay Masala Sandwich) बनवून खाऊ शकता. तर जाणून घ्या बॉम्बे मसाला सँडविचची रेसिपी
Published by :
Siddhi Naringrekar

साहित्य

ब्रेड

काकडी

टोमॅटो

कांदा

उकडलेले बटाटे

चाट मसाला

काळे मीठ

ताजी काळी मिरी

हिरवी चटणी

लोणी

सँडविच कसे बनवाल

प्रथम काकडी, टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे तुकडे करून घ्या. आता ब्रेडच्या स्लाइसवर बटर लावून त्यावर हिरवी चटणी पसरवा. आता ब्रेड स्लाइसवर काकडी आणि टोमॅटो ठेवा, नंतर मसाले आणि इतर ब्रेड स्लाइस ठेवा. आता या स्लाइसवरही बटर आणि हिरवी चटणी लावा आणि नंतर कांदा आणि बटाट्याचा थर द्या. आता सँडविच तव्यावर ठेवून भाजून घ्या आणि नंतर कापून घ्या. त्यावर किसलेले चीज टाका आणि चहासोबत सर्व्ह करा.

Bombay Masala Sandwich
Bombay Masala Sandwich

सँडविचसाठी चटणी कशी बनवायची

धणे, हिरवी मिरची, आले चांगले धुवून नंतर चांगले बारीक करून घ्या. आता त्यात काळे मीठ, जिरे आणि आंबट मलई घालून पुन्हा एकदा वाटूण घ्या. चटणी तयार

Bombay Masala Sandwich
Bombay Masala Sandwich
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com