Bottle Gourd
Bottle GourdTeam Lokshahi

दुधी भोपळ्याच्या रसाचे रोजच्या आहारात करा समावेश होतील 'हे' फायदे

दुधी भोपळ्याची भाजी आपल्यापैकी अनेकांना आवडत नाही. पण तुम्हाला हे माहित आहे का? दुधी खाण्याचे अनेक फायदे आहे. तसेच दुधी भोपळा व त्याचा रस प्यायल्याने अनेक फायदे होतात.
Published by :
shamal ghanekar

दुधी भोपळ्याची भाजी आपल्यापैकी अनेकांना आवडत नाही. पण तुम्हाला हे माहित आहे का? दुधी खाण्याचे अनेक फायदे आहे. तसेच दुधी भोपळा व त्याचा रस प्यायल्याने अनेक फायदे होतात. थंडीच्या दिवसात दुधी भोपळ्याचा रस आपल्याला खूप फायदेशीर असतो. त्यामध्ये १२% पाण्याचे प्रमाण असते. दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने वाढते वजन, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक आजारापासून बजाव करण्यासाठी उपयुक्त असतो.

दुधी भोपळ्याचे रस पिण्याचे फायदे

  • जर आपण वाढत्या वजनामुळे त्रासले असाल तर अनेकजण व्यायाम करत असतात पण त्याचबरोबर आपण आपल्या खाण्याकडे पण लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच नियमित दुधी भोपळ्याचा रस प्या. त्यामुळे खूप वेळ आपले पोट भरल्यासारखे राहते आणि भूकपण जास्त लागत नाही. त्यामुळे आपले वाढते वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

  • जर तुम्ही नियमित दुधी भोपळ्याचे रस पित असाल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर ती नियंत्रित राहण्यासाठी मदत करते. २०० ग्राम दुधी भोपळ्याचे रस प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रोल प्रमाण कमी होते. त्यामुळे नेहमीच्या आहारामध्ये दुधीच्या रसाचे समावेश करा.

Bottle Gourd
तुळशीचे 'हे' आहेत लाभकारी फायदे
  • दुधी भोपळ्याचे रस आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अधिक प्रमाणत दुधीचे सेवन केले जाते. तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये दुधी भोपळ्याचा रसाचे समावेश केला.

  • नेहमीच आपण केसांच्या गळतीमुळे त्रासले आहोत. त्यावर उपाय म्हणून तुम्ही दुधी भोपळ्याचा रस पिऊ शकता. तसेच आवळ्याच्या रसामध्ये दुधी भोपळ्याचे रस मिक्स करून त्यानंतर ते प्यायलाने केसातील कोंडा कमी होण्यासाठी मदत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com