Hair Care
Hair CareTeam Lokshahi

केसांच्या वाढीसाठी या पदार्थांचा करा आहारात समावेश; असा दिसून येईल बदल...

केसांच्या समस्यांमुळे आपण अनेकवेळा त्रस्त असतो. केस लांब करण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा या विचारात आपण गोंधळून जातो.
Published by :

केसांच्या समस्यांमुळे आपण अनेकवेळा त्रस्त असतो. केस लांब करण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा या विचारात आपण गोंधळून जातो. केसांची वाढ न होणे हे अंतर्गत समस्यांमुळे देखील असू शकते. अशा परिस्थितीत आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास केस जाड आणि लांब होऊ शकतात. या गोष्टींबाबत जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे. आजचा हा लेख याच विषयावर आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला केस वाढवण्यासाठी तुमच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करू शकता हे सांगणार आहोत.

Hair Care
युरिक ऍसिडवर परिणामकारक ठरतील हे उपाय....


कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा


कढीपत्त्याच्या सेवनाने केस वाढवता येतात. कढीपत्त्याच्या सेवनाने पांढरे केस आणि केस गळणे या दोन्ही समस्या दूर होतात. अशा स्थितीत सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने केसांच्या वाढीत हळूहळू बदल होतात.

करवंदाच्या सेवनानेही केस वाढवता येतात. तुम्ही आवळा आणि कोरफडीचा रस देखील पिऊ शकता. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास आवळा पावडरमध्ये कोरफड मिसळून त्यापासून गोळ्या तयार करू शकता. याशिवाय केसांच्या समस्येसाठी तुम्ही वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.

शेंगदाण्याच्या सेवनाने केस वाढवता येतात. शेंगदाणे रात्रभर भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सेवन करा.

त्रिफळा घेतल्याने केस वाढतात. अशा स्थितीत झोपण्यापूर्वी त्रिफळा चहा घेणे हे केसांसाठी खूप उपयुक्त ठरते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com