INS VIKRANT
INS VIKRANT Team Lokshahi

भारताची समुद्र सुरक्षा आणखी मजबूत होणार; आयएनएस विक्रांत होणार नौदलात सामील

पंतप्रधान मोदी यांच्या प्रमुख उपस्थिती होणार कार्यक्रम
Published by :
Sagar Pradhan

भारताची समुद्र सुरक्षा आता जास्त बळकट होणार आहे. त्याचे कारण असे की, देशात बनवली गेलेली पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील होणार आहे. 2 सप्टेंबर रोजी आयएनएस विक्रांतच्या कमिशनिंगला केरळमधील कोचीतून सुरवात होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. याबाबत भारतीय नौदलाने गुरुवारी दिल्लीत माहिती दिली.

INS VIKRANT
'माझ्यातले गुण वर येऊच दिले नाहीत, मग मी मास्टरस्ट्रोक मारला'

पत्रकार परिषदेला बोलताना व्हाईस अॅडमिरल एसएन घोरमाडे म्हणाले की, 2 सप्टेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे. 40 हजार टन विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता असलेल्या जगातील सहा निवडक देशांच्या पंक्तीत भारत सामील झाला आहे. उर्वरित पाच देश अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि इंग्लंड आहेत. व्हाईस अॅडमिरलच्या मते, आयएनएस विक्रांतचा भारताच्या युद्ध ताफ्यात समावेश केल्याने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थिरता राखण्यास मदत होईल.

व्हाईस अॅडमिरल घोरमाडेंनी दिली माहीती

व्हाईस अॅडमिरल घोरमाडे म्हणाले की, विक्रांतवर 30 विमाने तैनात असतील. त्यापैकी 20 लढाऊ विमाने आणि 10 हेलिकॉप्टर असतील. सध्या विक्रांतवर मिग-29 के लढाऊ विमाने तैनात केली जातील. सोबतच अमेरिकेची F-18A सुपर हॉर्नेट किंवा फ्रान्सची राफेल (M) तैनात केली जाऊ शकते. या दोन्ही लढाऊ विमानांच्या चाचण्या सुरू झाल्या असून अंतिम अहवालानंतर कोणती लढाऊ विमाने तैनात करायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

घोरमाडे म्हणाले की, यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून विक्रांतवर मिग-29 लढाऊ विमाने तैनात करण्यास सुरुवात होईल. कोणत्याही विमानवाहू युद्धनौकेची ताकद म्हणजे त्यावर तैनात केलेली लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर असतात. शत्रूची कोणतीही युद्धनौका अगदी पाणबुडीला त्याला मारू शकणार नाही. विक्रांतचा टॉप स्पीड 28 नॉट्स आहे आणि तो एका वेळी 7500 नॉटिकल मैल अंतर कापू शकतो. म्हणजेच एका वेळी भारत सोडल्यानंतर तो ब्राझीलमध्ये पोहोचू शकतो. त्यावर तैनात केलेली लढाऊ विमाने एक ते दोन हजार मैलांचे अंतरही पार करू शकतात. अशी माहिती घोरमाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com