How to Fuel Plane : विमानात इंधन कुठे आणि कसे भरले जाते ? जाणून घ्या

How to Fuel Plane : विमानात इंधन कुठे आणि कसे भरले जाते ? जाणून घ्या

विमानाच्या पंखांमध्ये इंधन साठवण्याचे कारण जाणून घ्या
Published by :
Shamal Sawant

काही दिवसांपूर्वी गुजरात येथील विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हळहळला. या भीषण अपघातामध्ये शेकडो नागरिकांचा करुण अंत झाला. अहमदाबादवरुन लंडनसाठी उड्डाण केलेल्या विमान काही मिनिटांतच कोसळले. विमानामध्ये असलेल्या लाखों लीटर पेट्रोलमुळे प्रवाशांचे वाचणे मुश्किलच. पण इतक्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल कुठे भरले जाते? विमानाच्या कोणत्या भागात कसे पेट्रोल भरले जाते ? असे प्रश्न अनेकांना पडतात. याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया.

1. विमानात इंधन कुठे साठवले जाते ? 

विमानात इंधन भरणे हे त्याच्या इंजिनवर अवलंबून असते. उड्डाणादरम्यान इंधनाचा वापर खूप जास्त असतो विमानातील इंधन त्याच्या मुख्य भागात साठवले जात नाही, तर त्याच्या पंखांमध्ये (Wings) साठवले जाते. विमानातील हवेचे वजन आणि उचलण्याचे बल यामध्ये संतुलन राहावे यासाठी पंखांमध्ये इंधन साठवले जाते. विमानाच्या पंखांवर त्याच्या वजनाइतकी उचल शक्ती असणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच त्याच्या पंखांमध्ये इंधन ठेवले जाते.

2. विमानाचे पंख खूप मोठे पण... 

विमानाचे पंख खूप मोठे दिसत असले तरी ते आतून पूर्णपणे पोकळ असतात. या पंखांमध्ये जेट इंधन भरले जाते. याशिवाय, जर इतरत्र इंधन भरले तर विमानात संतुलन बिघडू शकते. परंतु लांब पल्ल्याच्या विमानांमध्ये, इंधन टाकी केवळ पंखांमध्येच नसते तर विमानाच्या मध्यभागी एक मोठी इंधन टाकी देखील असते. याला मध्यवर्ती इंधन टाकी म्हणतात. जेणेकरून लांब पल्ल्याच्या उड्डाणे न थांबता पूर्ण करता येतील.

3. इंधन कसे भरले जाते ? 

विमानात इंधन भरण्याची प्रक्रिया सामान्य कारपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. प्रमुख विमानतळांवर, विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी विशेष इंधन ट्रक असतात किंवा भूमिगत पाइपलाइन वापरल्या जातात. उड्डाण करण्यापूर्वी, एक इंधन ट्रक विमानाजवळ येतो आणि त्याच्या पंखाखाली एक विशेष नोजल बसवले जाते. याद्वारे विमानाला इंधन पुरवले जाते. ही प्रक्रिया संगणकाद्वारे नियंत्रित केली जाते, जेणेकरून विमानात आवश्यक प्रमाणातच इंधन भरता येईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com