बाप्पाच्या आवडता नैवेद्य उकडीच्या मोदकांची रेसिपी जाणून घ्या...

बाप्पाच्या आवडता नैवेद्य उकडीच्या मोदकांची रेसिपी जाणून घ्या...

लाडक्या गणरायाचे आज घरोघरी आगमन झाले. घरोघरी आणि सार्वजानिक गणेश मंडळात, घरोघरी एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे आज आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया!’…एक..दोन..तीन..चार…गणपतीचा जय जयकार!…असा जयघोष…ढोल-ताशांचा घुमणारा आवाज…गुलाल, फुलांची उधळण…अशा उत्साहात आज घरोघरी बाप्पाचे आगमन झाले.
Published by :
Siddhi Naringrekar

लाडक्या गणरायाचे आज घरोघरी आगमन झाले. घरोघरी आणि सार्वजानिक गणेश मंडळात, घरोघरी एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे आज आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया!’…एक..दोन..तीन..चार…गणपतीचा जय जयकार!…असा जयघोष…ढोल-ताशांचा घुमणारा आवाज…गुलाल, फुलांची उधळण…अशा उत्साहात आज घरोघरी बाप्पाचे आगमन झाले.

बाप्पाचा आवडता खाऊ म्हणजे मोदक. मोदक हा बाप्पाचा सर्वात प्रिय. चला तर मग जाणून घेऊया काय आहे रेसिपी

साहित्य

एक वाटी तांदुळाची पिठी (तांदूळ धुऊन, सावलीत वाळवून, दळून चाळलेली)

साखर किंवा गूळ - एक वाटी

नारळ - एक वाटी

तूप - दोन चमचे

वेलची पूड

तेल

सारण बनवण्याची कृती

मोदकासाठी सारण बनवताना खोवलेल्या नारळात साखर किंवा गूळ घालून ते मंद आचेवर शिजत ठेवावे. शिजताना ते मधून मधून हालवावे. जेणेकरून ते तळाला चिकटू नये. शिजत आल्यावर त्यात चमचाभर तांदळाची पिठी व खसखस पूड घालावी. त्यानंतर वेलची पूड घालून सारण हालवावे. आणि पुन्हा थोडे शिजवावे.

उकड

तांदळाच्या पिठीप्रमाणे पाणी उकळून घ्यावे. पाण्यात चवीपुरतं मीठ, दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा तेल घालावे. पाणी उकळल्यानंतर त्यात पिठी घालून ते हालवावे. झाकण ठेवून मंद गॅसवर दोन वाफा काढाव्या. उकड गरम असतानाच एखाद्या भांड्याच्या मदतीने मळावी. हाताने मळण्याइतपत झाल्यानंतर तेल किंवा पाण्याचा हात लावत मोदक घडवता येईल इतपत मऊसर ठेवावे.

मोदकाची कृती

उकडीचे लहान गोळे करून त्याची हाताने पारी बनवावी. वाटीचा आकार देऊन त्यात सारण भरावे आणि पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद कराव्या व टोक आणावे. मोदकाच्या कळ्या नेहमी विषम संख्येत म्हणजे तीन, पाच, सात किंवा नऊ अशा पाडाव्यात आणि त्यात सारण भरावे. तयार केलेले मोदक केळीच्या पानावर थोडे तुपाचे बोट लावून उकडायला ठेवावे. आणि गरम असतानाच त्यावर साजूक तूप घालून खायला द्यावे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com