दिनविशेष 10 जून 2023 : 10 जून दिनविशेष, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 10 जून 2023 : 10 जून दिनविशेष, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांची माहिती देणार आहोत.

10 जून : निर्जला एकादशी

दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळले जाते. ज्येष्ठ महिन्यात जलपूजन करणे महत्वाचे आहे कारण या महिन्यात सूर्यदेवाची तेज तीव्र असते त्यामुळे उष्णता अधिक वाढते. या एकादशीच्या व्रताचे पुण्य सर्व तीर्थयात्रा करणे असे मानतात.

1977 : अ‍ॅपल कॉम्प्युटर्सने आपला ’अ‍ॅपल-II’ हा संगणक विकण्यास सुरूवात केली.

1768 : ‘माधवराव पेशवे’ आणि ‘राघोबादादा’ यांच्यामधे धोडपची लढाई झाली.

1938 : अब्जाधीश उद्योजक बजाज उद्योग समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा जन्मदिन.

1955 : सर्वोत्कृष्ट भारतीय बॅडमिंटनपटू भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांचा जन्मदिन.

1890 : आसाम प्रांताचे शेवटचे पंतप्रधान आणि आसाम राज्याचे पहिले मुख्यमंत्री गोपीनाथ बोरदोलोई यांचा जन्मदिन.

1981 : अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय पॅराऑलम्पिक भाला फेकपटू देवेंद्र झाझरिया यांचा जन्मदिन.

1908 : भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण जनरल जयंतनाथ चौधरी यांचा जन्म.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com