दिनविशेष 12 जून 2023 : 12 जून दिनविशेष, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांची माहिती देणार आहोत.
12 जून : बालकामगार विरोधी दिन (Anti-Child Labor Day)
जागतिक बालकामगार विरोधी दिनाची सुरुवात आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 12 जून 2002 रोजी केली. बाल कामगारांच्या जागतिक स्थितीवर लक्ष केंद्रित करणे आणि बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात प्रयत्न करणे या उद्देशाने जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात येतो.
1894 : बौद्ध धर्माचे अभ्यासक आणि पाली भाषेतील विद्वान साहित्यिक पुरुषोत्तम विश्वनाथ बापट यांचा जन्मदिन.
2000 : मराठी लेखक, कवी, अभिनेते पु.ल. देशपांडे यांचे निधन.
1976 : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय संस्कृत-तंत्र अभ्यासक गोपीनाथ कविराज यांचे निधन.
1964 : ‘नेल्सन मंडेला’ यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
1905 : गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.
1996 : साली भारतीय पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केलं.
2016 : साली प्रसिद्ध भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी ऑस्ट्रेलिया देशांतील सिडनी या ठिकाणी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे विजेते पद पटकाविले.