दिनविशेष 13 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 13 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

एप्रिल महिना सुरू झाला आहे, तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

Dinvishesh 13 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 13 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: कोविड-१९ - जगभरात ५० करोड पेक्षा अधिक लोकाना कोरोना साठीची लागण.

१९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.

१९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.

१९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.

१९१९: जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.

१८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.

१७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

आज यांचा जन्म

१९७१: कार्ल्टन चॅपमन - भारतीय फुटबॉल खेळाडू (निधन: १२ ऑक्टोबर २०२०)

१९६३: गॅरी कास्पारॉव्ह - रशियन बुद्धिबळपटू

१९५६: सतीश कौशिक - अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक

१९४३: बिरखा बहादूर मुरिंगला - भारतीय लिंबू भाषेतील लेखक - पद्मश्री (निधन: ८ जून २०२२)

१९४०: नजमा हेपतुल्ला - राज्यसभा सदस्य

१९२२: ज्युलिअस न्येरेरे - टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: १४ ऑक्टोबर १९९९)

१९०६: सॅम्युअल बेकेट - आयरिश लेखक, नाटककार आणि कवी

१९०५: ब्रूनो रॉस्सी - इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक

१८९५: वसंत रामजी खानोलकर - भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे - पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २९ ऑक्टोबर १९७८)

१८९०: दादासाहेब तोरणे - मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक (निधन: १९ जानेवारी १९६०)

आज यांची पुण्यतिथी

२००८: दशरथ पुजारी - संगीतकार (जन्म: ३० ऑगस्ट १९३०)

२००५: निकोला ल्युबिसिक - सर्बिया देशाचे १०वे अध्यक्ष, जनरल आणि राजकारणी (जन्म: ४ एप्रिल १९१६)

२०००: बाळासाहेब सरपोतदार - चित्रपट निर्माते व वितरक

१९९९: डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले - कृषितज्ज्ञ

१९९०: एस. बालचंदर - भारतीय अभिनेते, गायक आणि वीणा वादक (जन्म: १८ जानेवारी १९२७)

१९८८: हिरामण बनकर - महाराष्ट्र केसरी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com