दिनविशेष 16 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
Dinvishesh 16 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 16 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
१९८५: लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लीम संघटनेची स्थापना झाली.
१९६०: अमेरिकी अणुपाणबुडी ट्रायटन ने पाण्याखालून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास प्रस्थान केले.
१९५९: फिडेल कॅस्ट्रो क्युबाच्या अध्यक्षपदी रुजू झाले.
१९१८: लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
१७०४: औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून त्याचे नाव नबिशहागड असे ठेवले.
१६५९: पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.
आज यांचा जन्म
१९७८: वासिम जाफर - भारतीय क्रिकेटपटू
१९६४: बेबेटो - ब्राझीलचे फुटबॉलपटू
१९५४: मायकेल होल्डिंग - वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू
१९४३: हुसेन दलवाई - भारतीय राजकारणी, खासदार आणि महाराष्ट्राचे खासदार (निधन: १६ मे २०२२)
१९२०: ऍना मे हेस - अमेरिकेतील पहिल्या महिला यूएस आर्मी जनरल (निधन: ७ जानेवारी २०१८)
१९०९: रिचर्ड मॅकडोनाल्ड - मॅकडोनाल्डचे सह-संस्थापक (निधन: १४ जुलै १९९८)
१८७६: रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे - भारतातील पहिले सीनियर रँग्लर (निधन: ६ मे १९६६)
१८१४: तात्या टोपे - स्वातंत्रवीर सेनापती (निधन: १८ एप्रिल १८५९)
१७४५: थोरले माधवराव पेशवे - मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा (निधन: १८ नोव्हेंबर १७७२)
१०३२: सम्राट यिंगझोन्ग - गाण्याचे सम्राट (निधन: २५ जानेवारी १०६७)
आज यांची पुण्यतिथी
२०२३: तुलसीदास बलराम - भारतीय फुटबॉलपटू (जन्म: ३० नोव्हेंबर १९३६)
२०२३: जटू लाहिरी - भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे आमदार (जन्म: २८ एप्रिल १९३६)
२०१५: राजिंदर पुरी - भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार (जन्म: २० सप्टेंबर १९३४)
२०१५: आर. आर. पाटील - भारतीय वकील व राजकारणी (जन्म: १६ ऑगस्ट १९५७)
२००१: रंजन साळवी - मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक
२०००: बेल्लारी केसवन - भारतीय सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ - पद्मश्री (जन्म: १० मे १९०९)
१९९६: आर. डी. आगा - उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक
१९९४: पं. निवृत्तीबुवा सरनाईक - जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (जन्म: ४ जुलै १९१२)
१९९२: जॅनियो क्वाड्रोस - ब्राझील देशाचे २२वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २५ जानेवारी १९१७)
१९७०: फ्रान्सिस पेटन राऊस - पॅथॉलॉजिस्ट आणि विषाणूशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: ५ ऑक्टोबर १८७९)