दिनविशेष 16 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 16 जून 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

जून महिना सुरू झाला आहे, तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

Dinvishesh 16 June 2024 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 16 जून रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१३: उत्तराखंड ढगफुटी - केदारनाथ येथे अनेक दिवस झालेल्या मुसळधार पाऊसामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले, यात किमान ६ हजार लोकांचे निधन. ही २००४ च्या सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती आहे.

२०१२: शेन्झोऊ ९ अंतराळयान - चीनने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.

२०१०: भूतान - देश तंबाखूवर पूर्णपणेबंदी करणारा हा जगातील पहिला देश बनला.

१९९०: मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.

१९७७: ओरॅकल कॉर्पोरेशन - कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) म्हणून सुरु झाली.

१९६३: व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा - या अंतराळ प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळयात्री बनल्या.

१९४७: नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठाचेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.

१९१४: लोकमान्य टिळक - यांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका.

१९११: इंटरनॅशनल बिझनेस मशीनस् कॉर्पोरेशन (आय. बी. एम.) - कंपनीची कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग म्हणून सुरवात झाली.

१९०३: फोर्ड मोटर - कंपनीची सुरवात.

आज यांचा जन्म

१९९४: आर्या आंबेकर - गायिका

१९६८: अरविंद केजरीवाल - दिल्लीचे ७वे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संस्थापक

१९५०: मिथुन चक्रवर्ती - भारतीय अभिनेते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

१९३६: अखलाक मुहम्मद खान - ऊर्दू कवी - साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: १३ फेब्रुवारी २०१२)

१९२०: हेमंत कुमार - गायक, संगीतकार आणि निर्माते - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: २६ सप्टेंबर १९८९)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: हरिभाऊ माधव जावळे - भारतीय राजकारणी (जन्म: १ जून १९५३)

२०१५: चार्ल्स कोरिया - भारतीय आर्किटेक्ट - पद्म विभूषण, पद्मश्री (जन्म: १ सप्टेंबर १९३०)

२०१४: कॅन्डिडो मुआतेतेमा रिवास - इक्वॅटोगुइनियन राजकारणी, इक्वेटोरियल गिनी देशाचे पंतप्रधान (जन्म: २० फेब्रुवारी १९६०)

१९९५: माई मंगेशकर - मंगेशकरांच्या मातोश्री

१९७७: श्रीपाद गोविंद नेवरेकर - मराठी रंगभूमीवरील गायक-नट (जन्म: ३ जुलै १९१२)

१९७१: जॉन रीथ - बीबीसीचे सह-संस्थापक (जन्म: २० जुलै १८८९)

१९५३: मार्गारेट बॉन्डफिल्ड - युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला (जन्म: १७ मार्च १८७३)

१९४४: आचार्य प्रफुल्लचंद्र रे - बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीचे संस्थापक (जन्म: २ ऑगस्ट १८६१)

१९३०: एल्मर ऍम्ब्रोस स्पीरी - अमेरिकन संशोधक, आधुनिक नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचे जनक (जन्म: १२ ऑक्टोबर १८६०)

१९२५: चित्तरंजन दास - भारतीय बंगाली कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ५ नोव्हेंबर १८७०)

१८६९: चार्ल्स स्टर्ट - भारतीय-इंग्रजी वनस्पतिशास्त्रज्ञ आणि संशोधक (जन्म: २८ एप्रिल १९७५)

१८६९: चार्ल्स स्टर्ट - भारतीय-इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक (जन्म: २८ एप्रिल १७९५)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com