दिनविशेष 19 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
Dinvishesh 19 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 19 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
१९७५: आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.
१९७१: सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.
१९५६: गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
१९४८: ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९४५: सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१५२६: मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मोगलसत्तेचा पाया घातला.
आज यांचा जन्म
१९८७: मारिया शारापोव्हा - रशियन लॉनटेनिस खेळाडू
१९७७: अंजू बॉबी जॉर्ज - भारतीय लाँग जम्पर - पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
१९५७: मुकेश अंबानी - भारतीय उद्योगपती
१९३३: डिकी बर्ड - ख्यातनाम क्रिकेट पंच
१९१२: ग्लेन टी. सीबोर्ग - प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे करून उत्पादन करणारे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (निधन: २५ फेब्रुवारी १९९९)
१८९७: पीटर दि नरोन्हा - भारतीय उद्योगपती (निधन: २४ जुलै १९७०)
१८९२: ताराबाई मोडक - शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या (निधन: ३१ ऑगस्ट १९७३)
१८६८: पॉल हॅरिस - रोटरी क्लबचे संस्थापक (निधन: २७ जानेवारी १९४७)
आज यांची पुण्यतिथी
२०१३: सिवंती आदिथन - शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती आणि परोपकारी - पद्मश्री (जन्म: २४ सप्टेंबर १९३६)
२०१३: अल नेउहार्थ - यूए.एस.ए. टुडेचे स्थापक (जन्म: २२ मार्च १९२४)
२०१०: मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष - लेखक टीकाकार (जन्म: ७ जून १९१३)
२००९: अहिल्या रांगणेकर - मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या (जन्म: ८ जुलै १९२२)
२००८: सरोजिनी बाबर - लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी (जन्म: ७ जानेवारी १९२०)
२००४: नॉरिस मॅक्विहिर - गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सहसंस्थापक
१९९८: सौ. विमलाबाई गरवारे - उद्योजीका (जन्म: १८ डिसेंबर १९२८)
१९९४: मेजर जनरल राजिंदरसिंग - पंजाबचे माजी मंत्री
१९९३: डॉ. उत्तमराव पाटील - स्वातंत्र्यसैनिक
१९५५: जिम कॉर्बेट - ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक (जन्म: २५ जुलै १८७५)
१९१०: अनंत कान्हेरे - क्रांतिकारक (जन्म: ७ जानेवारी १८९२)
१९०६: पियरे क्युरी - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: १५ मे १८५९)
१८८१: बेंजामिन डिझरेली - इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: २१ डिसेंबर १८०४)

