दिनविशेष 24 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
Dinvishesh 24 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 24 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२०२२: रुसो-युक्रेनियन युद्ध - रशियाने युक्रेनवर पूर्ण-प्रमाणावर आक्रमण सुरू केले.
२०१०: सचिन तेंडुलकर - एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारे पहिले खेळाडू बनले.
२००८: फिडेल कॅस्ट्रो - ३२ वर्षांनी क्युबा देशाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.
१९९७: रशिया - देशाच्या मीर या अंतराळस्थानात आग लागली.
१९७१: ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक - पक्षाची आपत्कालीन केंद्रीय समितीची बैठक, यात तीन दिवसांपूर्वी अध्यक्ष हेमंथा कुमार बोस यांची हत्या झाल्यामुळे पी. के. मुकिया तेवर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
१९६१: तामिळ नाडू - मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळ नाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
१९५२: कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) - सुरूवात झाली.
१९३८: ड्युपॉन्ट - कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.
१९२०: नॅन्सी एस्टर - संसद सदस्य (एमपी) म्हणून निवडून आल्यानंतर युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
१९२०: नाझी पार्टी (NSDAP) - स्थापना झाली.
१९१८: इस्टोनिया - देशाला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.
आज यांचा जन्म
१९८५: नकाश अझीझ - भारतीय पार्श्वगायक आणि संगीतकार
१९६७: ब्रायन श्मिट - ऑस्ट्रेलियन खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक
१९५५: स्टीव्ह जॉब्ज - ऍपल इंक कंपनीचे सहसंस्थापक (निधन: ५ ऑक्टोबर २०११)
१९५१: लैमडोटा स्ट्रॉजुमा - लॅटव्हिया देशाचे १२वे पंतप्रधान
१९४८: जे. जयललिता - तामिळ नाडूच्या मुख्यमंत्री, अभिनेत्री (निधन: ५ डिसेंबर २०१६)
१९४७: एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन - इंग्लिश लेखक (निधन: २९ फेब्रुवारी १९४०)
१९४४: इविका रॅकन - क्रोएशिया देशाचे ७वे पंतप्रधान (निधन: २९ एप्रिल २००७)
१९४२: गायत्री चक्रवर्ती - भारतीय तत्त्वज्ञानी
१९३८: फिल नाइट - नायकी इंक कंपनीचे सहसंस्थापक
१९३४: बेटिनो क्रॅक्सी - इटलीचे देशाचे ४५वे पंतप्रधान (निधन: १९ जानेवारी २०००)
१८३५: ज्युलियस वोगेल - न्यूझीलंड देशाचे ८वे पंतप्रधान (निधन: १२ मार्च १८९९)
१८३१: लिओ वॉन कॅप्रीव्ही - जर्मनी देशाचे चांसलर (निधन: ६ फेब्रुवारी १८९९)
१६७०: छत्रपती राजाराम महाराज - मराठा साम्राज्याचे ३रे छत्रपती (निधन: ३ मार्च १७००)
आज यांची पुण्यतिथी
२०१८: श्रीदेवी - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री (जन्म: १३ ऑगस्ट १९६३)
२०१६: पीटर केनिलोरिया - सोलोमन बेटांचे पहिले पंतप्रधान (जन्म: २३ मे १९४३)
२०११: अनंत पै - भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि भारतीय कॉमिक्समधील अग्रगण्य (जन्म: १७ सप्टेंबर १९२९)
१९९०: सँड्रो पेर्टिनी - इटली देशाचे ७वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २५ सप्टेंबर १८९६)
१९८६: रुक्मिणीदेवी अरुंडेल - भारतीय भरतनाट्यम नर्तिका (जन्म: २९ फेब्रुवारी १९०४)
१९७५: निकोलाई बुल्गानिन - सोव्हिएत युनियनचे ६वे पंतप्रधान (जन्म: ११ जून १८९५)
१९६७: मीर उस्मान अली खान - हैदराबाद राज्याचे शेवटचे निजाम (जन्म: ६ एप्रिल १८८६)
१९३६: लक्ष्मीबाई टिळक - भारतीय मराठी साहित्यिक
१९२५: जल्मार ब्रांटिंग - स्वीडन देशाचे १६वे पंतप्रधान - नोबेल पारितोषिक (जन्म: २३ नोव्हेंबर १८६०)
१८७९: शिरानुई कोमोन - जपानी सुमो पैलवान, ११वे योकोझुना (जन्म: ३ मार्च १८२५)
१८७६: जोसेफ जेनकिन्स रॉबर्ट्स - लायबेरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष. (जन्म: १५ मार्च १८०९)
१८१५: रॉबर्ट फुल्टन - अमेरिकन अभियंते व संशोधक (जन्म: १४ नोव्हेंबर १७६५)
१८१०: हेन्री कॅव्हेंडिश - ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, हायड्रोजन आणि ऑरगॉन वायूंचा शोध लावणारे (जन्म: १० ऑक्टोबर १७३१)
१६७४: प्रतापराव गुजर - मराठा साम्र्याज्यातील सेनापती