दिनविशेष 25 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 25 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

Dinvishesh 25 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 25 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९६: स्वर्गदारा तील ताऱ्या;याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रजनाव देण्यात आले.

१९८६: जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.

१९६८: मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९४५: दुसरे महायुद्ध अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.

१९३५: फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई - नागपूर - जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.

१८१८: ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.

१५१०: पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.

आज यांचा जन्म

१९७४: दिव्या भारती - हिंदी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री (निधन: ५ एप्रिल १९९३)

१९४८: अभिनेते डॅनी डेंग्झोप्पा - चित्रपट

१९४३: जॉर्ज हॅरिसन - बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक (निधन: २९ नोव्हेंबर २००१)

१९३८: फारूक इंजिनिअर - भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच

१८९४: अवतार मेहेरबाबा - भारतीय आध्यात्मिक गुरू (निधन: ३१ जानेवारी १९६९)

१८४०: विनायक कोंडदेव ओक - भारतीय बालवाङ्‌मयकार (निधन: ९ ऑक्टोबर १९१४)

१७७८: जोस डे सान मार्टिन - पेरू देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: १७ ऑगस्ट १८५०)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: नईमतुल्ला खान - पाकिस्तानी वकील आणि राजकारणी (जन्म: १ ऑक्टोबर १९३०)

२०१६: भवरलाल जैन - जैन इरिगेशन सिस्टिमचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक - पद्मश्री (जन्म: १२ डिसेंबर १९३७)

२००१: सर डोनाल्ड ब्रॅडमन - ऑस्ट्रेलियन फलंदाज (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)

१९९९: ग्लेन टी. सीबोर्ग - प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे करून उत्पादन करणारे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १९ एप्रिल १९१२)

१९८०: गिरजाबाई महादेव केळकर - लेखिका वव नाटककार

१९७८: डॉ. प. ल. वैद्य - प्राच्यविद्यासंशोधक (जन्म: २९ जून १८९१)

१९६४: शांता आपटे - चित्रपट अभिनेत्री

१९२४: परशुरामभाऊ पटवर्धन - जमखिंडीचे संस्थानिक

१५९९: संत एकनाथ -

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com