दिनविशेष 27 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 27 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

Dinvishesh 27 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 27 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००२: मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.

२००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणाऱ्या;या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.

१९९९: पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.

१९५१: अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.

१९००: ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना.

१८४४: डॉमिनिकन रिपब्लिकला हैतीपासुन स्वातंत्र्य मिळाले.

आज यांचा जन्म

१९८६: संदीप सिंग - भारतीय हॉकी खेळाडू

१९३२: एलिझाबेथ टेलर - ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (निधन: २३ मार्च २०११)

१९२६: ज्योत्स्ना देवधर - मराठी व हिंदी लेखिका (निधन: १७ जानेवारी २०१३)

१९२५: शोइचिरो टोयोडा - टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष (निधन: १४ फेब्रुवारी २०२३)

१९१२: कुसुमाग्रज - भारतीय लेखक, कवी व नाटककार - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: १० मार्च १९९९)

१८९९: चार्ल्स हर्बर्ट बेस्ट - इन्सुलिनचे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ (निधन: ३१ मार्च १९७८)

आज यांची पुण्यतिथी

१९९७: इंदीवर - गीतकार श्यामलाल बाबू राय ऊर्फ

१९८७: अदि मर्झबान - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार आणि संपादक

१९३६: इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह - रशियन शास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: २६ सप्टेंबर १८४९)

१९३१: चंद्रशेखर आझाद - भारतीय थोर क्रांतिकारक (जन्म: २३ जुलै १९०६)

१८९२: लुई वूत्तोन - फॅशन कंपनी लुई वूत्तोनचे डिझायनर (जन्म: ४ ऑगस्ट १८२१)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com