दिनविशेष 28 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 28 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

Dinvishesh 28 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 28 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९४०: बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलेव्हिजन वर प्रक्षेपित झाला.

१९३५: वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.

१९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

१८४९: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्या;यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.

आज यांचा जन्म

१९५१: करसन घावरी - भारतीय क्रिकेटपटू

१९४८: विदुषी पद्मा तळवलकर - ग्वाल्हेर-किराणा-जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका

१९४८: बिनेंश्वर ब्रह्मा - भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक (निधन: १९ ऑगस्ट २०००)

१९४४: रविन्द्र जैन - संगीतकार व गीतकार

१९४४: रवींद्र जैन - भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक - पद्मश्री (निधन: ९ ऑक्टोबर २०१५)

१९२७: कृष्णकांत - भारताचे १० वे उपराष्ट्रपती (निधन: २७ जुलै २००२)

१९२५: दादासाहेब रूपवते - आंबेडकरी चळवळीचे नेते (निधन: २३ जुलै १९९९)

१८९७: डॉ. शंकर दामोदर पेंडसे - मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक (निधन: २३ ऑगस्ट १९७४)

आज यांची पुण्यतिथी

१९९९: भगवंतराव श्रीपतराव - औध संस्थानचे राजे

१९९५: कवी संजीव - संवाद व गीतलेखक (जन्म: १२ एप्रिल १९१४)

१९८६: ओलोफ पाल्मे - स्वीडनचे २६ वे पंतप्रधान (जन्म: ३० जानेवारी १९२७)

१९६७: हेन्री लुस - टाईम मॅगझिनचे सहसंस्थापक (जन्म: ३ एप्रिल १८९८)

१९६६: उदयशंकर भट्ट - आधुनिक हिंदी नाटककार आणि कादंबरीकार (जन्म: ३ ऑगस्ट १८९८)

१९६३: राजेन्द्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती - भारतरत्न (जन्म: ३ डिसेंबर १८८४)

१९३६: कमला नेहरू - जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी (जन्म: १ ऑगस्ट १८९९)

१९२६: कवी गोविंद - स्वातंत्र्यशाहीर (जन्म: ९ फेब्रुवारी १८७४)

१८८४: सुरेंद्र साई - भारतीय कार्यकरर्ते (जन्म: २३ जानेवारी १८०९)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com