8 July 2023 Dinvishesh : 8 जुलै दिनविशेष, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 8 July 2023 : सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 8 जुलै या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं
२०११: रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.) असलेली नाणी चलनात आली.
२००६: टी. एन. शेषन - यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९९७: एन. कुंजुरानी देवी - यांनी बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात रौप्यपदक पटकावले.
१९८८: लंडन सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन (London SPCC) - स्थापना
१९५८: दो आँखे बारह हाथ - या चित्रपटाला बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
१९३०: इंडिया हाऊस, लंडन - किंग जॉर्ज-५वे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर - यांनी मोरिया या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
१८८९: द वॉल स्ट्रीट जर्नल - पहिला अंक प्रकाशित झाला.
१८५६: चार्ल्स बर्न - यांना मशीनगनचे अमेरिकेतील पेटंट मिळाले.
१४९७: वास्को द गामा - युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाले.
आज यांचा जन्म
१९७२: सौरव गांगुली - भारतीय क्रिकेटपटू, बीसीसीआई (BCCI)चे ३९वे अध्यक्ष - पद्मश्री
१९४९: वाय. एस. राजशेखर रेड्डी - आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री
१९२२: अहिल्या रांगणेकर - मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या (निधन: १९ एप्रिल २००९)
१९१६: गो. नी. दांडेकर - ज्येष्ठ साहित्यिक - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: १ जून १९९८)
१९१४: ज्योती बसू - पश्चिम बंगालचे ७वे मुख्यमंत्री (निधन: १७ जानेवारी २०१०)
१८८५: हुगो बॉस - हुगो बॉस कंपनीचे संस्थापक (निधन: ९ ऑगस्ट १९४८)
१८३९: जॉन डी. रॉकफेलर - रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक (निधन: २३ मे १९३७)
१८३१: जॉन पंबरटन - कोकाकोलाचे निर्माते (निधन: १६ ऑगस्ट १८८८)
१७८९: ग्रँट डफ - मराठ्यांचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश अधिकारी (निधन: २३ सप्टेंबर १८५८)
८ जुलै निधन - दिनविशेष
२०२२: शिंजो ऍबे - जपानचे माजी पंतप्रधान (जन्म: 21सप्टेंबर १९५४)
२०२०: सुरमा भोपाली - भारतीय विनोदी अभिनेते (जन्म: २९ मार्च १९३९)
२०१३: सुन्द्री उत्तमचंदानी - भारतीय लेखक (जन्म: २८ सप्टेंबर १९२४)
२००७: चंद्रा शेखर - भारताचे ८वे पंतप्रधान (जन्म: १७ एप्रिल १९२७)
२००६: राजा राव - भारतीय लेखक, प्राध्यापक - पद्म विभूषण, पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ८ नोव्हेंबर १९०८)
२००३: ह. श्री. शेणोलीकर - संत साहित्याचे अभ्यासक
२००१: उस्ताद बाबासाहेब मिरजकर - प्रसिद्ध तबला वादक
१९९४: डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे - मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक गोवा पुराभिलेखचे संचालक
१९९४: किमसुंग २रे - उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ एप्रिल १९१२)
१९६७: विवियन ली - ब्रिटिश अभिनेत्री (जन्म: ५ नोव्हेंबर १९१३)
१६९५: क्रिस्टियन हायगेन्स - डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थवैज्ञानिक (जन्म: १४ एप्रिल १६२९)