दिनविशेष 09 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
Dinvishesh 09 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 09 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
१९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.
१९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
१९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.
१९७९: युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले.
१९७६: ऍपल कंपनीचे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.
१९७०: अपोलो-१३ यानाचे प्रक्षेपण झाले.
१९१९: इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
आज यांचा जन्म
१९५१: रोहिणी हटंगडी - अभिनेत्री
१९३७: रामनाथन कृष्णन - लॉनटेनिस खेळाडू
१९२०: एमिलियो कोलंबो - इटलीचे ४०वे पंतप्रधान (निधन: २४ जून २०१३)
१९०८: मसारू इबुका - सोनी कंपनीचे सहसंस्थापक (निधन: १९ डिसेंबर १९९७)
१९०६: डॉ. सुमित्र मंगेश कत्रे - संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक
१९०४: कुंदनलाल सैगल - भारतीय अभिनेते आणि गायक (निधन: १८ जानेवारी १९४७)
१८८७: जेमिनी रॉय - चित्रकार (निधन: २४ एप्रिल १९७२)
१८६९: कस्तुरबा गांधी - भारतीय राजकीय कार्यकर्त्या, महात्मा गांधी यांच्या पत्नी (निधन: २२ फेब्रुवारी १९४४)
१८२७: महात्मा फुले - भारतीय श्रेष्ठ समाजसुधारक (निधन: २८ नोव्हेंबर १८९०)
१७७०: जॉर्ज कॅनिंग - ब्रिटनचे पंतप्रधान (निधन: ८ ऑगस्ट १८२७)
१७५५: जेम्स पार्किन्सन - पार्किन्सन आजाराचे संशोधक (निधन: २१ डिसेंबर १८२४)
१६११: कार्ल युसेबियस - लिकटेंस्टाईनचे राजकुमार (निधन: ५ एप्रिल १६८४)
आज यांची पुण्यतिथी
२०१५: जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड - भारतीय लष्करचे (जन्म: ६ जुलै १९३३)
२०१२: अहमद बेन बेला - अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २५ डिसेंबर १९१६)
२००९: विष्णू प्रभाकर - भारतीय लेखक व नाटककार - पद्मा भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: २१ जून १९१२)
२००३: सीसिल हॉवर्ड ग्रीन - टेक्सास इन्स्ट्रूमेंटचे स्थापक (जन्म: ६ ऑगस्ट १९००)
२०००: कमल रणदिवे - भारतीय शास्त्रज्ञ, कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ - पद्म भूषण (जन्म: ८ नोव्हेंबर १९१७)
१९७७: फन्नीश्वर नाथ रेणू - भारतीय लेखक आणि कार्यकर्ते (जन्म: ४ मार्च १९२१)