दिनविशेष 9 जून 2023 : 9 जून दिनविशेष, जाणून घ्या या दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 9 जून 2023 : 9 जून दिनविशेष, जाणून घ्या या दिवसाच्या महत्वाच्या घटना

जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत.

1964 : भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लालबहादूर शास्त्री पदावर बसले

लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. 9 जून 1964 रोजी शास्त्रींची पंतप्रधान म्हणून एकमताने निवड केली.

1906 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक होते. एल्एल्.बी. झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरीचे शिक्षण घेण्यासाठी ते गेले.

जन्म

1977 : अभिनेत्री अमिशा पटेलचा जन्म.

1985 : अभिनेत्री सोनम कपूरचा जन्म.

निधन

1900 : आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू.

1834 : अर्वाचीन बंगाली आणि मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचे निधन.

1988 : अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ विवेक यांचे निधन.

1993 : बंगाली आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक सत्येन बोस यांचे निधन.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com