मध आणि लिंबूचे एकत्रित सेवन केल्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या….
आपल्या स्वयंपाकघरामध्ये अनेक गोष्टी असतात. मात्र, यामधील अनेक गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मधाचा आयुर्वेदीक औषधी (Ayurvedic Medicines) गुणधर्मांमध्येही उल्लेख होतो.
मधामध्ये विविध प्रकारचे अँटिऑक्सिडंट, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम, मॅंगनीज आणि जस्त यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात.
त्यामुळे वर्षानुवर्षे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांवर मध (Honey) हे घरगुती उपाय म्हणून वापरले जाते.
तसेच, रोग प्रतिकारशक्ती वाढवणे, वजन कमी करणे, पौष्टिक, मॉइश्चरायझिंग, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी इत्यादी मधाचे फायदे आहेत. हे वजन कमी करणे, सौंदर्य आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे.
मध हा नैसर्गिकरित्या केसांतील कोंडा कमी करण्यास मदत करतो. तसेच, मधाचा वापर हेअर पॅक बनवण्यासाठी तुम्ही करू शकता. वजन कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मध आणि अर्धा लिंबू (Honey & Lemon) यांचे मिश्रण तयार करा. दररोज सकाळी ते प्या, जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते, पचन प्रक्रिया गतिमान करते आणि अवयवांना पुनरुज्जीवित करते.
अॅसिडीटीवर गुणकारी:
मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल (Anti-Bacterial) आणि अँटी-फंगल (Anti-Fungal) गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टमला चालना देण्यासाठी मध गुणकारी ठरतो.