लेख : ‘सहस्रचंद्र दर्शन !
आपल्या मराठी संस्कृतित दिर्घायुष्य बद्दल फार गोच, विचारी आणि तेवढ्याच अर्थपूर्ण रूढी आहेत. कोणाची आठवण काढताच ती व्यक्ती येते तेव्हा हमखास 'शंभरी आहे तुला!' असं म्हटलं जातं.. वडिलधाऱ्यांचे आशिर्वाद घेताना इतर गोष्टींसोबत ते "आयुष्यमान भव" आवर्जून देतात. मराठी घरांमध्ये चंद्राला पण विषेश महत्तव असते. लहान मुलांना चांदोबा दाखत आई बाबा जेवण भरवतात, 'चांदोमामा चांदोमामा झोपलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?' हे बडबडगीत शिकवतात. एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या लहानपणी 'चांदोबा' हे मासिकही वाचले असेल. या दोन्ही गोष्टींना एकत्रीतपणे साजरं करणारी परंपरी म्हणजेच 'सहस्रचंद्र दर्शन'…
वयाची 81 वर्षे पूर्ण होत असताना त्या व्यक्तीने 1000 पौर्णिमा पाहिलेल्या असतातच. म्हणजेच आयुष्यात तेवढ्या पौर्णिमा आलेल्या असतात. हाच महोत्सव म्हणजे सहस्रचंद्र दर्शन.
हिशोब करायला गेलं तर, दरवर्षी १२ पौर्णिमा असतात. मग वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत एक व्यक्ती ९६० पौर्णिमा बघते. अधिक महिन्यांतले २७ पौर्णिमा मोजून एकूण ९८७ पौर्णिमा होतात. 1000ला कमी पडणाऱ्या १३ पौर्णिमा ८१ वर्षे १ महिन्यानंतर पूर्ण होतात, म्हणून सहस्रचंद्र दर्शन शांती ८१व्या वाढदिवसाच्या एक महिन्यानंतर करतात.
पण या शांतीसोहळ्याच आजच्या दिवशी काय महत्व? चला तर जाणून घेऊया…
आज कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच आषाढी पौर्णिमेसोबत चंद्रग्रहण. खरंतर आज चंद्राचे दर्शन होणं दुर्लभ आहे. पण आजच किंवा यानंतरच्या काही पौर्णिमेपूर्वी ज्यांना वयाची 81 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यांनी आज सहस्र पौर्णिमा बघित्या, जगल्या, अनुभवल्या. म्हणजेच आज त्यांचं होणार सहस्रचंद्रदर्शन!
सौर महिने तिशी किंवा एकतिशी असतात, फेब्रुवारीचा अपवाद वगळता. चांद्रमास असते 29.53 दिवसांचे. तुमच्या जन्मवर्षामध्ये एकोणतीस हजार पाचशे तीस दिवस मिळवल्यावर ८१ वर्षे होतात. म्हणूनच या काळात, पुढच्या पौर्णिमेपूर्वी ज्यांचा 81वा वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी आजच्या पौर्णिमेला सहस्त्रावा चंद्राचे दर्शन होते.
माणसाच्या आयुष्यातला तिसरा कालखंड, म्हणजेच वानप्रस्थाश्रम वयाच्या ५०व्या वर्षापासुन चालू होतो. त्या व्यक्तिचं पुढचं आयुष्य सुखकर आणि सुलभ जावं म्हणुन आपल्या ऋषी-मुनींनी विचारपुर्वक वयाच्या ५०व्या वर्षापासून वेगवेगळ्या शांती करायला सांगितले आहे.
- वयाच्या पन्नासाव्या वर्षी – वैष्णवशांती
- वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी – वारुणी शांती
- वयाच्या साठाव्या वर्षी – उग्ररथ शांती
- वयाच्या पासष्टाव्या वर्षी – मृत्युंजय महारथी शांती
- वयाच्या सत्तराव्या वर्षी – भौमरथी शांती
- वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी – ऐंद्री शांती
- वयाच्या ऐंशीव्या वर्षानंतर – सहस्रचंद्रदर्शन शांती
- वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी – रौद्री शांती
- वयाच्या नव्वदाव्या वर्षी – कालस्वरूप रौद्री शांती
- वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी – त्र्यंबक मृत्युंजय शांती
- वयाच्या शंभराव्या वर्षी – त्र्यंबक महामृत्युंजय शांती
आपण बरेचदा भारतीय संस्कृतीला दुय्यल स्थान देऊन पाश्चात्य संस्कृतिची कास धरतो. पण आपल्या पुर्वजांनी सगळ्या गोष्टी फार विचारपुर्वक केल्या आहेत. सहस्रचंद्रदर्शन शांती चंद्र दाखवून नाही, तर आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत गप्पागोष्टी करत साजरी होते. का? तर, वयाच्या साठाव्या वर्षानंतर माणूस निवृत्त होतो. पण याचसोबत त्यांच्या आयुष्यात रीकामपणा, नैराश्य येतं. आपल्याला ते अजुनही हवे आहेत, त्यांच्या अस्तित्वाची अजुनही आपल्याला गरज आहे, हे सांगण्याचं फक्त निमीत्तमात्र, म्हणजेच सहस्रचंद्रदर्शन होय!