लोकशाही स्पेशल
Holi 2025 Wishes : होळीचा आनंद साजरा करा अन् आपल्या प्रियजनांना द्या धुलीवंदनानिमित्त 'या' खास शुभेच्छा
Dhulivandan 2025 Wishes In Marathi : होळी, रंगपंचमी, धूलिवंदन.. रंगांचा सण. या दिवसाला सर्व लोक उत्साहाने रंग खेळतात. त्याचबरोबर एकमेकांना सणाच्या गोड गोड शुभेच्छाही द्या. आम्ही तुमच्यासाठी सुंदर शुभेच्छा क्वोट्स घेऊन आलो आहोत.
"रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…
धुलीवंदन हार्दिक शुभेच्छा"
प्रेम, आनंद, सौहार्द आणिविश्वासाच्या रंगात रंगते होळी रंगीत होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
वाईटाचा होवो नाश…आयुष्यात येवो सुखाची लाट…होळीच्या सगळ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!
पाणी जपुनिया, घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा, होळी खेळण्यास, प्रेमाचा एक रंगच पुरेसा.. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
रंग साठले मनी अंतरी, उधळू त्यांना नभी चला, आला आला रंगोत्सव हा आला.. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!