दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा! मित्र, नातेवाईकांना पाठवा 'या' विशेष शुभेच्छा
Dasara 2023 : दसरा हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात. या दिवशी रामाने रावणाचा वध केला. श्रीरामाच्या चांगुलपणाने रावणाच्या वाईट कृत्यांवर विजय मिळवला, म्हणून हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील साजरा केला जातो. या विशेष दिनी आपल्या जवळच्या लोकांना, मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना खास शुभेच्छा द्या.
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा...
केवळ सोन्यासारख्या लोकांना...
हॅप्पी दसरा!
श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया...
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...!
वाईटावर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपट्याच्या पानांची
होते देवाणघेवाण...
प्रेमाचा ओलावा
करुनि दान...
शुभ दसरा...!