दिनविशेष 1 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 1 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
shweta walge
Published on

Dinvishesh 1 November 2023: सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 1 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

आंतरराष्ट्रीय लेनोक्स-गॅस्टॉट सिंड्रोम जागरूकता दिवस

२००५: योगेशकुमार सभरवाल - यांनी भारताचे ३६वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०००: छत्तीसगड राज्य - हे अधिकृतपणे भारताचे २६ वे राज्य बनले.

२०००: संयुक्त राष्ट्र - सर्बिया आणि मॉन्टेनेग्रो प्रजासत्ताक देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

१९९३: युरोपियन युनियन - मास्ट्रिच करारामुळे औपचारिकपणे स्थापना झाली.

१९८४: शीखविरोधी दंगली - भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी हत्या केल्यानंतर शीखविरोधी दंगली उसळल्या.

१९८२: होंडा - अमेरिकेत कार तयार करणारी पहिली आशियाई ऑटोमोबाईल कंपनी बनली.

१९८१: अँटिग्वा आणि बारबुडा - देशांना युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९७९: ग्रिसेल्डा अल्वारेझ - मेक्सिको राज्याच्या पहिल्या महिला गव्हर्नर बनल्या.

१९७३: कर्नाटक राज्य - भारताच्या म्हैसूर राज्याचे नामकरण करण्यात आले.

१९६८: मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिका - या संस्थेची चित्रपट रेटिंग प्रणाली अधिकृतपणे सुरु झाली.

१९६६: पंजाब - राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.

१९६३: अरेसिबो वेधशाळा - आतापर्यंत बांधलेली सर्वात मोठी रेडिओ दुर्बिणी अधिकृतपणे पोर्तो रिको येथे उघडली.

१९५७: मॅकिनाक ब्रिज - त्यावेळचा जगातील सर्वात लांब झुलता पूल तयार झाला.

१९५६: भारत - देशात केरळ, आंध्र प्रदेश आणि म्हैसूर या राज्यांचे औपचारिकपणे राज्य पुनर्रचना कायद्यांतर्गत नवीन राज्ये तयार करण्यात आली.

१९५२: अमेरिका - देशाने आयव्ही माईक या पहिल्या थर्मोन्यूक्लियर उपकरणाचा यशस्वीपणे स्फोट केला.

१९४५: संयुक्त राष्ट्र - ऑस्ट्रेलिया देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९४५: चोंग्रो - हेअधिकृत उत्तर कोरियाचे वृत्तपत्र रोडॉन्ग सिनमुन पहिल्यांदा प्रकाशित झाले.

१९४१: अँसेल ऍडम्स - अमेरिकन छायाचित्रकार यांनी चंद्रोदयाचे पहिले छायाचित्र काढले.

१९२८: भारत - विधेयकात बदल करून त्याचे कायद्यात रुपांतर केले आणि नवी महसूल संहिता लागू करण्यात आली.

१९२५: स्वराज्य पक्ष - पक्षाच्या तिन्ही प्रांतिक समित्यांची एक अनौपचारिक संयुक्त बैठक झाली.

१९२२: ऑट्टोमन साम्राज्य - शेवटचा सुलतान, मेहमेद सहावा यांनी राजीनामा दिला आणि ओट्टोमन साम्राज्य संपुष्टात आले.

१९१८: पश्चिम युक्रेन - ऑस्ट्रिया-हंगेरीपासून वेगळे झाले.

१९१४: पहिले महायुद्ध - कोरोनेलची लढाई: जर्मनीबरोबरच्या युद्धात ब्रिटीश रॉयल नेव्हीचा पहिला पराभव.

१९११: इटालो-तुर्की युद्ध - दरम्यान लिबियामध्ये जगातील पहिली लढाऊ हवाई बॉम्बफेक मोहीम झाली.

१८९७: जुव्हेंटस - या इटालियन स्पोर्ट क्लब ची स्थापना.

१८९६: नॅशनल जिओग्राफिक मॅगझिन - मध्ये पहिल्यांदाच नग्न स्त्रीचे चित्र प्रकाशित झाले.

१८९४: निकोलस दुसरा - रशियाचा नवीन (आणि शेवटचा) झार बनला.

१८७०: अमेरिकेन हवामान विभाग - पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.

१८४८: बोस्टन फिमेल मेडिकल स्कूल - महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, अमेरिका येथे सुरू झाले.

१८४५: ग्रांट मेडिकल कॉलेज, मुंबई - या भारतातील पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाची सुरवात.

१८०५: नेपोलियन बोनापार्ट - यांनी ऑस्ट्रियावर आक्रमण केले.

१८००: जॉन ऍडम्स - व्हाईट हाऊस (कार्यकारी हवेली) मध्ये राहणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले.

१७६५: स्टॅम्प कायदा - ब्रिटिश साम्राज्याने उत्तर अमेरिकेतील ब्रिटिश लष्करी ऑपरेशन्सला पैसे देण्यास मदत करण्यासाठी तेरा वसाहतींवर कायदा लागू केला.

१७५५: पोर्तुगालमधील भूकंप आणि सुनामी - यामुळे लिस्बन शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, या दुघटनेत किमान ६० हजार ते ९० हजार लोकांचे निधन.

१६८३: मराठा साम्राज्य - फोंडाची लढाई: छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने पोर्तुगिजांचा पराभव केला.

१६११: टेम्पेस्ट नाटक - विल्यम शेक्सपियर यांचे नाटक प्रथमच सादर करण्यात आले.

१६०४: ऑथेलो नाटक - विल्यम शेक्सपियर यांचे नाटक प्रथमच सादर करण्यात आले.

१५५५: रिओ दि जानेरो, ब्राझील - येथे फ्रान्स अंटार्क्टिक वसाहत स्थापन करण्यात आली.

आज यांचा जन्म

आंतरराष्ट्रीय लेनोक्स-गॅस्टॉट सिंड्रोम जागरूकता दिवस

१९८७: इलियाना डिक्रूझ - भारतीय-पोर्तुगीज अभिनेत्री आणि मॉडेल

१९७४: वी. वी. एस. लक्ष्मण - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री

१९७३: ऐश्वर्या राय - भारतीय अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड - पद्मश्री, मिस वर्ल्ड (१९९४)

१९६३: नीता अंबानी - भारतीय उद्योजीका

१९६०: टीम कूक - ऍपल इन्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी

१९५३: जॅन डेव्हिस - अमेरिकन अंतराळवीर, पती मार्क ली सोबत अंतराळात जाणारे पहिले विवाहित जोडी

१९४५: नरेंद्र दाभोलकर - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष - पद्मश्री (निधन: २० ऑगस्ट २०१३)

१९४०: रमेश चंद्र लाहोटी - भारताचे ३५वे सरन्यायाधीश (निधन: २३ मार्च २०२२)

१९३४: देबी घोसाल - भारतीय राजकारणी, खासदार (निधन: ५ ऑगस्ट २०२२)

१९३२: अरुण कोलटकर - भारतीय इंग्रजी व मराठी कवी (निधन: २५ सप्टेंबर २००४)

१९२६: यशवंत देव - भारतीय संगीत दिग्दर्शक, कवी

१९२१: शरद तळवलकर - भारतीय मराठी विनोदी अभिनेते (निधन: २१ ऑगस्ट २००१)

१८९३: इंदुभूषण बॅनर्जी - भारतीय आधुनिक बंगाली इतिहासकार (निधन: १३ नोव्हेंबर १९५६)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: विजयकुमार मेनन - भारतीय कला समीक्षक, लेखक आणि अनुवादक

२००७: एस. अली रझा - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक (जन्म: ९ जानेवारी १९२५)

२००५: योगिनी जोगळेकर - भारतीय लेखिका (जन्म: ६ ऑगस्ट १९२५)

१९९६: ज्युनिअस जयवर्धने - श्रीलंकेचे २रे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १७ सप्टेंबर १९०६)

१९९४: कॉम्रेड दत्ता देशमुख - भारतीय शेतीतज्ञ आणि कामगार नेते

१९९३: नैनोदेवी - भारतीय ठुमरी, दादरा व गझल गायिका

१९९१: अरुण पौडवाल - भारतीय संगीतकार व संगीत संयोजक

१९८८: गोविंदस्वामी आफळे - भारतीय ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार

१९५०: बिभूतिभूषण बंदोपाध्याय - भारतीय बंगाली साहित्यिक (जन्म: १२ सप्टेंबर १८९४)

१८७३: दीनबंधू मित्र - भारतीय बंगाली नाटककार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com