दिनविशेष 17 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 17 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
shweta walge
Published on

Dinvishesh 17 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 17 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००८: कोसोव्हो देशाने स्वातंत्र्य जाहीर केले.

१९९६: महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्ह यांच्या कडून पराभूत.

१९६४: अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.

१९३३: अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होती.

१९२७: रणदुंदुभि नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१८५९: द ग्रेट अटलांटिक आणि पॅसिफिक टी कंपनी (A&P) - सुरवात.

१८०१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह् ने जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.

आज यांचा जन्म

१९६३: जेन-ह्सून हुआंग - एनव्हीडियाचे सहसंस्थाक

१९५१: जगदीश मोहंती - भारतीय लेखक आणि अनुवादक (निधन: २९ डिसेंबर २०१३)

१९४४: बर्नी ग्रँट - ग्रेट ब्रिटन मधील संसदेत निवडून येणारे पहिले कृष्णवर्णीय (निधन: ८ एप्रिल २०००)

१८८०: अल्वारो ओब्रेगन - मेक्सिको देशाचे ४६वे राष्ट्राध्यक्ष (निधन: १७ जुलै १९२८)

१८७४: थॉमस वॉटसन - अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM)चे अध्यक्ष (निधन: १९ जून १९५६)

१८५४: फ्रेडरिक क्रूप्प - जर्मन उद्योगपती (निधन: २२ नोव्हेंबर १९०२)

१७८१: रेने लायेनेस्क - स्टेथोस्कोपचे शोधक (निधन: १३ ऑगस्ट १८२६)

आज यांची पुण्यतिथी

२०२३: अमृतपाल छोटू - भारतीय विनोदी अभिनेते

२०२३: विजय किचलू - भारतीय शास्त्रीय गायक - पद्मश्री (जन्म: १६ सप्टेंबर १९३०)

२०२३: जॉन मेसन - भारतीय शिक्षणतज्ञ (जन्म: १० जानेवारी १९४५)

२०२३: शाहनवाज प्रधान - भारतीय अभिनेते

१९८८: कापुरी ठाकूर - बिहारचे ११वे मुख्यमंत्री (जन्म: २४ जानेवारी १९२४)

१९८६: जे. कृष्णमूर्ती - भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: १२ मे १८९५)

१९७८: पुरुषोत्तम शिवराम रेगे - कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (जन्म: २ ऑगस्ट १९१०)

१८८३: वासुदेव बळवंत फडके - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पहिले सशस्त्र क्रांतिकारक (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५)

१८८१: लहुजी वस्ताद - क्रांतीवीर, समाजसेवक

१६००: जिओर्डानो ब्रुनो - सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com