दिनविशेष 21 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
Dinvishesh 21 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 21 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
७५३: रोम्युलस यांनी रोम स्थापन केले. (पारंपारिक तारीख)
२०००: आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमलात आणला.
१९९७: भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली.
१९७२: अपोलो-१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
१९६०: रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानीचे उद्घाटन झाले.
आज यांचा जन्म
१९५०: शिवाजी साटम - हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते
१९३४: डॉ. गुंथर सोन्थायमर - महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक
१९२६: एलिझाबेथ (दुसरी) - इंग्लंडची राणी (निधन: ८ सप्टेंबर २०२२)
१९२२: ऍलिएस्टर मॅकलिन - स्कॉटिश साहसकथा लेखक (निधन: २ फेब्रुवारी १९८७)
१८६४: मॅक्स वेबर - जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ (निधन: १४ जून १९२०)
१७९०: मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा - चिली देशाचे पहिले राष्ट्रपती (निधन: ५ सप्टेंबर १८७६)
१६५१: जोसेफ वाझ - भारतीय-श्रीलंकन धर्मगुरू आणि संत (निधन: १६ जानेवारी १७११)
१६१९: जॅन व्हॅन रिबेक - केपटाऊन शहराचे संस्थापक (निधन: १८ जानेवारी १६७७)
आज यांची पुण्यतिथी
२३४: हानचा सम्राट झियान - चिनी सम्राट (जन्म: २ एप्रिल १८१)
२०१३: शकुंतला देवी - भारतीय गणितज्ञ (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)
२००६: जॉनी चेकेट्स - न्यूझीलंडचे वैमानिक, दुसऱ्या महायुद्धातील फ्लाइंग एस (जन्म: २० फेब्रुवारी १९१२)
२००५: फिनोझ खान - भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू (जन्म: ९ सप्टेंबर १९०४)
१९९६: अब्दुल हफीज कारदार - पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि लेखक (जन्म: १७ जानेवारी १९२५)
१९४६: जॉन मायनार्ड केन्स - ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ५ जून १८८३)
१९३८: सर मोहम्मद इक़्बाल - सारे जहाँ से अच्छा गीताचे कवी आणि राजकारणी (जन्म: ९ नोव्हेंबर १८७७)
१९१८: मॅनफ्रेड फॉन रिचथोफेन (द रेड बॅरन) - जर्मन लढाऊ पायलट, ज्यांना ८० हवाई लढाऊ विजयांचे अधिकृतपणे श्रेय दिले जाते. (जन्म: २ मे १८९२)
१९१०: मार्क ट्वेन - विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार (जन्म: ३० नोव्हेंबर १८३५)
१८८९: सेबॅस्टियन लेर्डो डी तेजाडा - मेक्सिको देशाचे अध्यक्ष (जन्म: २४ एप्रिल १८२३)
१५०९: हेन्री (सातवा) - इंग्लंडचा राजा (जन्म: २८ जानेवारी १४५७)