दिनविशेष 21 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 21 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published on

Dinvishesh 21 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 21 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९६५: विच्छा माझी पुरी करा या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.

१९१३: ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.

आज यांचा जन्म

१९६३: गोविंदा - हिंदी चित्रपट अभिनेते

१९५९: कृष्णम्माचारी श्रीकांत - भारतीय क्रिकेटपटू

१९३२: यू. ए. अनंतमूर्ती - भारतीय लेखक, कवी आणि नाटककार (निधन: २२ ऑगस्ट २०१४)

१९३२: जॉर्ज नेदुंगट - भारतीय जेसुइट पुजारी आणि धर्मगुरू (निधन: २६ ऑक्टोबर २०२२)

१९२१: पी. एन. भगवती - भारताचे १७ वे सरन्यायाधीश

१९०३: आबासाहेब गरवारे - भारतीय उद्योजक, गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक - पद्म भूषण (निधन: २ नोव्हेंबर १९९०)

आज यांची पुण्यतिथी

२०१२: जिझु दासगुप्ता - भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक (जन्म: ३ सप्टेंबर १९५६)

२००४: अवतार सिंग पेंटल - भारतीय न्यूरोलॉजिस्ट - पद्म विभूषण (जन्म: २४ सप्टेंबर १९२५)

१९९७: पी. सावळाराम - जनकवी भावगीत लेखक (जन्म: ४ जुलै १९१४)

१९९७: पं. प्रभाशंकर गायकवाड - सनईवादक

१९९३: राजाभाऊ कुलकर्णी - स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार

१९७९: नरहर फाटक - चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक (जन्म: १५ एप्रिल १८९३)

१८२४: जेम्स पार्किन्सन - पार्किन्सन आजाराचे संशोधक (जन्म: ११ एप्रिल १७५५)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com