दिनविशेष 23 जून 2023 : 1985 मध्ये एअर इंडिया विमानात बॉम्बस्फोट; 329 प्रवाशांचे निधन

दिनविशेष 23 जून 2023 : 1985 मध्ये एअर इंडिया विमानात बॉम्बस्फोट; 329 प्रवाशांचे निधन

कॅलेंडरमधील प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व असतं. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत.
Published on

23th June 2023 Dinvishesh: सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 23 जून या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं

आंतरराष्ट्रीय विधवा दिन

संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन

२०१७: पाकिस्तान दहशतवादी हल्ला - आतंकवादी हल्ल्याच्या मालिकेत किमान ९६ लोकांचे निधन तर किमान २०० लोक जखमी.

१९८५: दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट. ३२९ ठार.

१९८५: एअर इंडिया फ्लाइट 182 - आतंकवादी बॉम्बचा स्फोट हल्ल्यात हे विमान कोसळले, त्यात ३२९ प्रवासी लोकांचे निधन.

१९७९: क्रिकेट विश्वकप - वेस्ट इंडीजने इंग्लंडला पराभूत करून २री विश्वकप स्पर्धा जिंकली.

१९२७: भारतीय नभोवाणी - मुंबई येथे सुरु.

१८९४: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती - स्थापना झाली.

आज यांचा जन्म

१९८०: रामनरेश सरवण - वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू

१९७२: झिनेदिन झिदान - फ्रेंच फुटबॉलपटू

१९४८: नबरुण भट्टाचार्य - भारतीय पत्रकार आणि लेखक (निधन: ३१ जुलै २०१४)

१९४२: जब्बार पटेल - दिग्दर्शक

१९३५: राम कोलारकर - मराठी लेखक

१९१६: लेन हटन - इंग्लिश क्रिकेटपटू (निधन: ६ सप्टेंबर १९९०)

१९०१: राजेन्द्र नाथ लाहिरी - क्रांतिकारक (निधन: १७ डिसेंबर १९२७)

१८७७: नॉर्मन प्रिचर्ड - भारतीय-इंग्लिश अभिनेते (निधन: ३१ ऑक्टोबर १९२९)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: निलंबर देव शर्मा - भारतीय डोंगरी भाषेतील साहित्याबद्दल इंग्रजीतील पहिले प्रकाशन केलेले लेखक - पद्मश्री (जन्म: ६ ऑक्टोबर १९३१)

२००६: बुधी कुंदरन - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: २ ऑक्टोबर १९३९)

२००५: डॉ. हे. वि. इनामदार - साहित्यिक

१९९५: जोनास साल्क - पोलिओची लस शोधणारे अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ (जन्म: २८ ऑक्टोबर १९१४)

१९९४: वसंत शांताराम देसाई - नाटककार, साहित्यिक

१९८२: हरिभाऊ देशपांडे - नामवंत कलाकार

१९८०: संजय गांधी - इंदिरा गांधी यांचा मुलगा (जन्म: १४ डिसेंबर १९४६)

१९५३: श्यामा प्रसाद मुखर्जी - भारतीय जनसंघाचे संस्थापक (जन्म: ६ जुलै १९०१)

१९३९: गिजुभाई बधेका - आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते (जन्म: १५ नोव्हेंबर १८८५)

१९१४: भक्तिविनाडो ठाकूर - भारतीय गुरु आणि तत्वज्ञ (जन्म: २ सप्टेंबर १८३८)

१७६१: नानासाहेब पेशवा - मराठा साम्राज्याचे ८वे पेशवा (जन्म: ८ डिसेंबर १७२०)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com