दिनविशेष 26 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 26 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 26 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२००४: ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सुनामी लाट निर्माण होऊन भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पडले.
१९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार.
१९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.
१९८२: टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.
१९७६: कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.
१९७५: मॅक २ पेक्षा जोरात उडणारे जगातील पहिले व्यावसायिक सुपरसॉनिक टु - १४४ विमानसेवा सुरू झाली.
१८९८: मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.
१८९५: लुईस आणि ऑगस्ट लुइम यांनी तिकीट विक्री करून पहिल्या चित्रपटाचा पहिला शो पॅरिस येथे प्रदर्शित केला.
आज यांचा जन्म
१९४८: प्रकाश आमटे - भारतीय सामाजिक कार्यकर्ते - पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
१९४१: लालन सारंग - रंगभूमीवरील कलाकार
१९३५: डॉ. मेबल आरोळे - बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका - रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २७ सप्टेंबर १९९९)
१९२५: पं. के. जी. गिंडे - धृपद गायक, संगीतकार शिक्षक (निधन: १३ जुलै १९९४)
१९१७: डॉ. प्रभाकर माचवे - साहित्यिक
१९१४: बाबा आमटे - भारतीय कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारे समाजसेवक - पद्म विभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: ९ फेब्रुवारी २००८)
१९१४: सुशीला नायर - स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री (निधन: ३ जानेवारी २०००)
आज यांची पुण्यतिथी
२००६: दाजी भाटवडेकर - रंगभूमी अभिनेते (जन्म: १५ सप्टेंबर १९२१)
२०००: प्रा. शंकर गोविंद साठे - नाटककार आणि साहित्यिक
१९९९: शंकरदयाळ शर्मा - भारताचे ९वे राष्ट्रपती व ८वे उपराष्ट्रपती (जन्म: १९ ऑगस्ट १९१८)
१९८९: के. शंकर पिल्ले - व्यंगचित्रकार आणि लेखक (जन्म: ३१ जुलै १९०२)
१९७५: के. सरस्वती अम्मा - भारतीय लेखक आणि नाटककार (जन्म: १४ एप्रिल १९१९)