दिनविशेष 26 जुलै 2023 : कारगिल विजय दिन; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 26 जुलै 2023 : कारगिल विजय दिन; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published on

Dinvishesh 26 July 2023 : सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 26 जुलै या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

कारगिल विजय दिन

२०१६: सोलार इम्पल्स २ - हे पृथ्वीभोवती फिरणारे पहिले सौर उर्जेवर चालणारे विमान ठरले.

२००८: अहमदाबाद बॉम्बस्फोट - या हल्ल्यात किमान ५६ लोकांचे निधन तर २०० पेक्षा जास्त लोक जखमी.

२००५: स्पेस शटल प्रोग्राम - STS-114 मिशन: डिस्कवरी उपग्रहाचे प्रक्षेपण.

२००५: मुंबई ढगफुटी - २४ तासांत ९९.५ सेंटीमीटर (३९.१७ इंच) पाऊस पडला, परिणामी पुरामुळे किमान ५,००० लोकांचे निधन.

१९९४: उस्ताद बिस्मिला खान - यांना राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार जाहीर.

१९७१: अपोलो कार्यक्रम - अपोलो १५ चे प्रक्षेपण करण्यात आले.

१९६५: मालदीव - देशाला युनायटेड किंग्डम आणि इंग्लंड पासून स्वातंत्र्य.

१९६३: सिन्कॉम २ - जगातील पहिला जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.

१९६३: सिनकॉमया - या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.

१९५८: एक्सप्लोरर प्रोग्राम - एक्सप्लोरर ४ प्रक्षेपित करण्यात आले.

१९५३: २६ जुलै क्रांती - फिडेल कॅस्ट्रो यांनी मोनकाडा बॅरेक्सवर अयशस्वी हल्ला केला, येथूनच क्यूबन क्रांतीची सुरुवात झाली.

१८९२: दादाभाई नौरोजी - ब्रिटनमधील पहिले भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले.

१७५८: फ्रेंच आणि भारतीय युद्ध - ब्रिटीश सैन्याने फ्रेंच सैन्याचा पराभव करून सेंट लॉरेन्सच्या आखातावर ताबा मिळवला. लुईसबर्गचा वेढा संपला.

१७४५: पहिला महिला क्रिकेट सामना - गिल्डफोर्ड, इंग्लंड येथे खेळण्यात आल्याचे नोंद करण्यात आले.

१५०९: विजयनगर साम्राज्य - सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.

आज यांचा जन्म

१९८६: मुग्धा गोडसे - अभिनेत्री मॉडेल

१९२८: इब्न-ए-सफ़ी - भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी (निधन: २५ जुलै १९८०)

१९२७: गुलाबराय रामचंद - भारतीय क्रिकेट खेळाडू

१८९४: वासुदेव गोविंद मायदेव - कवी समाजसेवक (निधन: ३० ऑगस्ट १९६९)

१८९३: पं. कृष्णराव शंकर पंडित - ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (निधन: २२ ऑगस्ट १९८९)

१८७५: कार्ल युंग - मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (निधन: ६ जून १९६१)

१८६५: रजनीकांत सेन - भारतीय कवी आणि संगीतकार (निधन: १३ सप्टेंबर १९१०)

आज यांची पुण्यतिथी

२०१५: बिजॉय कृष्णा हांडिक - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: १ डिसेंबर १९३४)

२०१०: शिवकांत तिवारी - भारतीय सिंगापुरियन राजकारणी (जन्म: २० डिसेंबर १९४५)

१८९१: राजेन्द्रलाल मित्रा - प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com