दिनविशेष 26 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 26 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 26 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२००८: पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैय्यबा ने मुंबई येथे दहशदवाद्याचा आतंकवादी हल्ला. या घटनेला २६११ म्हणून ओळखले जाते.
२००८: महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.
२००८: २६/११ - मुंबई आतंकवादी हल्ला
१९९९: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.
१९९८: खाणा रेल्वे अपघातात २१२ जणांचा मृत्यू झाला.
१९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.
१९६५: ऍॅस्टॅरिक्स (A-) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.
१९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.
१९४१: लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला.
१८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.
आज यांचा जन्म
१९८३: क्रिस ह्यूजेस - फेसबुकचे सहसंस्थापक
१९७२: अर्जुन रामपाल - हिंदी चित्रपट अभिनेते
१९६१: करण बिलिमोरिया - कोबरा बीयरचे सहसंस्थापक
१९५४: वेल्लुपल्ली प्रभाकरन - एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam)चे संस्थापक (निधन: १८ मे २००९)
१९४९: मारी अल्कातीरी - पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान
१९३९: टीना टर्नर - अमेरिकन-स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका
१९३८: रॉडनी जोरी - ऑस्ट्रेलियन भौतिकशास्रज्ञ
१९३३: गोविंद पानसरे - भारतीय लेखक आणि राजकारणी (निधन: २० फेब्रुवारी २०१५)
१९२६: रवी रे - भारतीय राजकारणी
१९२४: जसुभाई पटेल - भारतीय क्रिकेटपटू
१९२३: व्ही. के. मूर्ति - भारतीय सिनेमॅटोग्राफर (निधन: ७ एप्रिल २०१४)
१९२३: राजा ठाकूर - चित्रपट दिग्दर्शक (निधन: २८ जुलै १९७५)
१९२१: व्हर्गिस कुरियन - भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (निधन: ९ सप्टेंबर २०१२)
१९१९: राम शरण शर्मा - भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक (निधन: २० ऑगस्ट २०११)
१९०४: के. डी. सेठना - भारतीय कवि, विद्वान आणि लेखक (निधन: २९ जून २०११)
१९०२: मॉरिस मॅकडोनाल्ड - मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक (निधन: ११ डिसेंबर १९७१)
१८९८: कार्ल झीगलर - जर्मन रसायन शास्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: १२ ऑगस्ट १९७३)
१८९०: सुनीतिकुमार चटर्जी - भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक (निधन: २९ मे १९७७)
१८८५: देवेन्द्र मोहन बोस - वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक (निधन: २ जून १९७५)
१८२८: रेने गॉब्लेट - फ्रान्स देशाचे ५२वे पंतप्रधान (निधन: १३ सप्टेंबर १९०५)
आज यांची पुण्यतिथी
२०२०: फकीर चंद कोहली - भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक - पद्म विभूषण (जन्म: १९ मार्च १९२४)
२०१६: इव्हान मिकोयान - रशियन विमान मिग-२९चे सह-निर्माते आणि डिझायनर
२०१२: एम. सी. नंबुदरीपद - भारतीय लेखक आणि अनुवादक (जन्म: २ फेब्रुवारी १९१९)
२००८: हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते - मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी
२००८: अशोक कामटे - भारतीय शहीद पोलिस कमिशनर - अशोकचक्र (जन्म: २३ फेब्रुवारी १९६५)
२००१: चंद्रकांत कृष्णाजी जगताप - शिल्पकार
१९९४: भालजी पेंढारकर - मराठी चित्रपटसृष्टीचे महर्षी (जन्म: ३ मे १८९७)
१९५७: पेट्रोस व्होल्गारिस - ग्रीस देशाचे १३६वे पंतप्रधान (जन्म: १३ सप्टेंबर १८८३)
१९४३: लेफ्टनंट एडवर्ड ओ'हेअर - अमेरिकन नौदल वैमानिक, दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेचे पहिले फ्लाइंग ऐस (जन्म: १३ मार्च १९१४)