दिनविशेष 28 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 28 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published on

Dinvishesh 28 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 28 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

दिनविशेष 28 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Birthday Special : रतन टाटांचं 'हे' अनमोल विचार देतील जीवनाला दिशा

आज काय घडलं?

१९९५: कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या आयआरएस १-सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण केले.

१९४८: मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.

१९०८: मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५००० लोकांचे

१८८५: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्ष स्थापन झाला.

१८४६: आयोवा हे अमेरिकेचे २९ वे राज्य बनले.

१८३६: स्पेनने मेक्सिको देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

१६१२: गॅलिलियो यांनी नेपच्यून ग्रहाची नोंदी केली, परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.

आज यांचा जन्म

१९५२: अरुण जेटली - भारतीय राजकीय नेते - पद्म विभूषण (निधन: २४ ऑगस्ट २०१९)

१९४०: ए. के. अँटनी - भारताचे परराष्ट्रमंत्री

१९३७: रतन टाटा - भारतीय उद्योगपती, परोपकारी टाटा समूहाचे अध्यक्ष एमेरिटस - पद्म विभूषण, पद्म भूषण

१९३५: एस. बालसुब्रमण्यम - भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक (निधन: १९ डिसेंबर २०१४)

१९३२: धीरुभाई अंबानी - भारतीय उद्योगपती, रिलायन्सचे संस्थापक - पद्म विभूषण (निधन: ६ जुलै २००२)

१९२६: शिरीष कुमार - भारतीय स्वातंत्र्यसैनिक (निधन: ९ सप्टेंबर १९४२)

१८९९: उधम सिंग - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक (निधन: ३१ जुलै १९४०)

१८९९: गजानन त्र्यंबक माडखोलकर - प्रसिद्ध मराठी पत्रकार. समीक्षक आणि कादंबरीकार (निधन: २७ नोव्हेंबर १९७६)

आज यांची पुण्यतिथी

२००६: प्रभाकर पंडित - संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म: ३० सप्टेंबर १९३३)

२००३: कुशाभाऊ ठाकरे - वकील आणि राजकारणी (जन्म: १५ ऑगस्ट १९२२)

२०००: उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर - भारतीय ध्रुपद गायक - पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: २० ऑक्टोबर १९२३)

२०००: मेघश्याम रेगे - तत्त्वचिंतक (जन्म: २४ जानेवारी १९२४)

१९८१: डेविड अब्राहम चेऊलकर - हिंदी चित्रपट अभिनेते

१९७७: सुमित्रानंदन पंत - हिंदी कवी (जन्म: २० मे १९००)

१९६७: द. गो. कर्वे - अर्थशास्त्रज्ञ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com