दिनविशेष 28 जुलै 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 28 July 2023 : सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 28 जुलै या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
जागतिक हिपॅटायटीस दिन
२०१७: नवाझ शरीफ - पाकिस्तानचे पंतप्रधान, यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आजीवन पदासाठी अपात्र ठरवले.
२००१: इयान थॉर्प - जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सहा सुवर्णपदके जिंकणारे पहिले जलतरणपटू ठरले.
२००१: इंदिरा गोस्वामी - आसामी लेखिका, यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
१९७९: चौधरी चरणसिंग - यांची भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी निवड.
१९७६: चीन - देशाच्या तांग्शान प्रांतात रिश्टर ७.८ ते ८.२ तीव्रतेचा भूकंप. २,४२,७६९ लोकांचे निधन तर १,६४,८५१ जखमी झाले.
१९६०: फोक्सवॅगन कायदा अंमलात आला.
१९५७: इसहाया, जपान ढगफुटी - येथे झालेल्या मुसळधार पाऊसमुळे किमान ९९२ लोकांचे निधन.
१९३४: काँग्रेस राष्ट्रीय पक्ष - पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी स्थापना केली.
१८६६: विनी रीम - यांना वयाच्या 18 व्या वर्षी अमेरिकेच्या सरकारकडून अब्राहम लिंकनच्या पुतळ्यासाठी कमिशन प्राप्त करणारी पहिली आणि सर्वात तरुण महिला कलाकार बनली.
१८२१: पेरू - देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
आज यांचा जन्म
१९३६: सरगॅरी सोबर्स - वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू
१९३२: हिरेन भट्टाचार्य - भारतीय कवी आणि लेखक - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: ४ जुलै २०१२)
१९२९: जॅकलिन केनेडी - जॉन एफ. केनेडी यांची पत्नी
१९०९: के. ब्रह्मानंद रेड्डी - आंध्र प्रदेशचे ३रे मुख्यमंत्री (निधन: २० मे १९९४)
आज यांची पुण्यतिथी
२०२०: रवी कोंडाला राव - भारतीय तेलगू अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक (जन्म: ११ फेब्रुवारी १९३२)
२०१६: महाश्वेता देवी - भारतीय बंगाली लेखक, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या - पद्म विभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: १४ जानेवारी १९२६)
१९८१: बाबूराव गोखले - नाटककार (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)
१९७७: पंडित राव नगरकर - गायक आणि अभिनेते
१९७५: राजा ठाकूर - चित्रपट दिग्दर्शक (जन्म: २६ नोव्हेंबर १९२३)