दिनविशेष 28 ऑक्टोबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 28 ऑक्टोबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published on

Dinvishesh 28 October 2023 : सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 28 ऑक्टोबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

दिनविशेष 28 ऑक्टोबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा

आज काय घडलं?

आंतरराष्ट्रीय अ‍ॅनिमेशन दिन

१९६९: तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.

१९२२: बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.

१९०४: पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१८८६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.

१६३६: अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना.

१४९०: क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबामध्ये पोहोचले.

१४२०: बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.

आज यांचा जन्म

१९५८: अशोक चव्हाण - महाराष्ट्राचे १६वे मुख्यमंत्री

१९५५: इंद्रा नूयी - भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी

१९५५: बिल गेटस् - मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक

१९३०: अंजान - प्रसिद्ध गीतकार (निधन: १३ सप्टेंबर १९९७)

१८९३: शंकर केशव कानेटकर - कवी गिरीश तथा (निधन: ४ डिसेंबर १९७३)

१८९३: कवी गिरीश - शंकर केशव कानेटकर ऊर्फ (निधन: ४ डिसेंबर १९७३)

१८६७: भगिनी निवेदिता - भारतीय तत्वज्ञानी, स्वामी विवेकानंदांच्या शिष्या (निधन: १३ ऑक्टोबर १९११)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: नील पवन बरुआ - भारतीय चित्रकार (जन्म: १ जून १९३६)

२०१३: राजेंद्र यादव - भारतीय लेखक (जन्म: २८ ऑगस्ट १९२९)

२०११: श्री लाल शुक्ला - भारतीय लेखक (जन्म: ३१ डिसेंबर १९२५)

१८११: यशवंतराव होळकर बहादूर - राजराजेश्वर सवाई श्रीमंत (जन्म: ३ डिसेंबर १७७६)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com