दिनविशेष 29 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 29 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 29 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
१९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.
१९७२: अटारी यांनी पोंग हा गेम प्रकाशित केला.
१९६३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन समिती नेमली.
१८७७: थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.
आज यांचा जन्म
१९६३: ललित मोदी - भारतीय उद्योगपती
१९२९: मुनीर हुसेन - भारतीय क्रिकेटरपटू (निधन: २९ जुलै २०१३)
१९२६: भाऊ पाध्ये - लेखक, पत्रकार (निधन: ३० ऑक्टोबर १९९६)
१९०८: एन. एस. क्रिश्नन - तमिळ चित्रपट अभिनेते
१९०७: गोपीनाथ तळवलकर - बालसाहित्यिक (निधन: ७ जून २०००)
१८६९: ठक्कर बाप्पा - समाजसेवक (निधन: २० जानेवारी १९५१)
आज यांची पुण्यतिथी
२०११: इंदिरा गोस्वामी - आसामी साहित्यिक व कवियत्री
१९९३: जे. आर. डी. टाटा - भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक - भारतरत्न, पद्म विभूषण (जन्म: २९ जुलै १९०४)
१९५९: गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार (जन्म: १७ मे १८६५)
१९५०: बाया कर्वे - महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी
१९३९: माधव ज्युलियन - मराठी भाषेतील कवी (जन्म: २१ जानेवारी १८९४)
१९२६: कृष्णाजी नारायण आठल्ये - ग्रंथकार, संपादक, कवी आणि चित्रकार