दिनविशेष 30 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 30 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published on

Dinvishesh 30 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 30 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००६: इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली.

१९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.

१९२४: एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.

१९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.

आज यांचा जन्म

१९२३: प्रकाश केर शास्त्री - भारतीय शैक्षणिक व राजकारणी (निधन: २३ नोव्हेंबर १९७७)

१९०२: डॉ. रघू वीरा - भाषाशास्त्रज्ञ राजकीय नेते (निधन: १४ मे १९६३)

१८८७: डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी - मुंबईचे पहिले गृहमंत्री (निधन: ८ फेब्रुवारी १९७१)

१८७९: वेंकटरमण अय्यर - भारतीय तत्त्ववेत्ते (निधन: १४ एप्रिल १९५०)

आज यांची पुण्यतिथी

२००९: विष्णुवर्धन - भारतीय अभिनेते (जन्म: १८ सप्टेंबर १९५०)

१९९०: रघुवीर सहाय - भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक (जन्म: ९ डिसेंबर १९२९)

१९८७: एन. दत्ता - संगीतकार दत्ता नाईक

१९७४: शंकरराव देव - गांधीवादी कार्यकर्ते

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com