दिनविशेष 4 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 4 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 4 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२००७: फिनिक्स - हे नासाचे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.
२००१: भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.
१९९८: कोरेझॉन अॅक्विनो - फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा, यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९९३: राजेन्द्र खंडेलवाल - यांनी अपंग असून सुद्धा समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुट उंचीवर असलेली खारदुंगला ही खिंड कायनेटिक होंडा स्कूटरवर पार केली. त्याच्या या कामगिरीची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मधे नोंद झाली.
१९५६: भाभा अणुशक्ती केंद्र, तुर्भे - येथे सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
१७८३: माउंट असामा, जपान ज्वालामुखी - येथे झालेल्या उद्रेकामुळे किमान १४०० लोकांचे निधन.
आज यांचा जन्म
१९७८: संदीप नाईक - भारतीय राजकारणी
१९६१: बराक ओबामा - अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष - नोबेल पुरस्कार
१९५०: एन. रंगास्वामी - भारतीय वकील आणि राजकारणी
१९४३: हैदर अली - भारतीय क्रिकेट खेळाडू (निधन: ५ नोव्हेंबर २०२२)
१९३९: अमीन फहीम - भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी (निधन: २१ नोव्हेंबर २०१५)
१९३१: शिवाजीराव पाटील निलंगेकर - महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री (निधन: ४ ऑगस्ट २०२०)
१९३१: नरेन ताम्हाणे - भारतीय क्रिकेटपटू (निधन: १९ मार्च २००२)
१९२९: किशोर कुमार - भारतीय पार्श्वगायक, संगीतकार आणि आभिनेते (निधन: १३ ऑक्टोबर १९८७)
१८९४: नारायण फडके - साहित्यिक व वक्ते (निधन: २२ ऑक्टोबर १९७८)
१८६३: वासुदेवशास्त्री अभ्यंकर - पतंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय
१८४५: सर फिरोजशहा मेहता - भारतीय कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते (निधन: ५ नोव्हेंबर १९१५)
१७३०: सदाशिवराव भाऊ - पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती (निधन: १४ जानेवारी १७६१)
आज यांची पुण्यतिथी
२०२२: जी. एस. पणिकर - भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक
२०२०: शिवाजीराव पाटील निलंगेकर - महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री (जन्म: ४ ऑगस्ट १९३१)
२००६: नंदिनी सत्पथी - भारतीय लेखक व राजकारणी (जन्म: ९ जून १९३१)
१९३७: डॉ. काशीप्रसाद जायस्वाल - प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १८८१)