दिनविशेष 5 ऑक्टोबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 5 ऑक्टोबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published on

Dinvishesh 5 October 2023 : सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 5 ऑक्टोबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोधी दिन

जागतिक शिक्षक दिन

१९९८: ए. पी. जे. अब्दुल कलाम - यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.

१९९५: इंदिरा संत - कवयित्री यांना जनस्थान पुरस्कार जाहीर.

१९८४: मार्क गार्न्यु - पहिले कॅनेडियन अंतराळवीर बनले.

१९८३: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT&T) - सुरवात.

१९७०: पब्लिक ब्रॉडकास्टींग सर्व्हिस (PBS) - स्थापना झाली.

१९६२: जेम्स बाँड - डॉ. नो हा जेम्स बाँड मालिकेतील पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.

१९५५: हिंदुस्तान मशिन टूल्स - उदघाटन. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

१९४८: अश्गाबात भूकंप - किमान १, १०,००० लोकांचे निधन.

१९०५: राइट फ्लायर III - या विमानातून राईट बंधूंनी ३९ मिनिटांत २४ मैलांचे नवीन विश्वविक्रमी उड्डाण केले.

१८६४: कोलकाता चक्रीवादळ दुर्घटना - भीषण चक्री वादळामुळे किमान ६०,००० लोकांचे निधन.

आज यांचा जन्म

१९६४: सरबिंदू मुखर्जी - भारतीय क्रिकेटपटू

१९३२: माधव आपटे - भारतीय क्रिकेटपटू

१९२३: कैलाशपती मिश्रा - भारतीय राजकारणी, गुजरातचे १५वे राज्यपाल (निधन: ३ नोव्हेंबर २०१२)

१९२२: यदुनाथ थत्ते - लेखक, संपादक (निधन: १० मे १९९८)

१९२२: शंकरसिंग रघुवंशी - शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार (निधन: २६ एप्रिल १९८७)

१८९५: हेमंथा कुमार बसू - ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष (निधन: २० फेब्रुवारी १९७१)

१८९०: किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला - तत्त्वज्ञ व हरिजनचे संपादक

आज यांची पुण्यतिथी

२०२२: पराग कंसारा - भारतीय विनोदी कलाकार

१९९७: चित्त बसू - फॉरवर्ड ब्लॉकचे सरचिटणीस (जन्म: २५ डिसेंबर १९२६)

१९९२: अप्पासाहेब पंत - भारतीय मुत्सद्दी आणि स्वातंत्र्य सेनानी - पद्मश्री (जन्म: ११ सप्टेंबर १९१२)

१९९१: रामनाथ गोएंका - इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक (जन्म: ३ एप्रिल १९०४)

१९९०: राजकुमार वर्मा - भारतीय नाटककार, समीक्षक व कवी - पद्म भूषण (जन्म: १५ सप्टेंबर १९०५)

१९८१: भगवतीचरण वर्मा - भारतीय हिंदी लेखक - पद्म भूषण (जन्म: ३० ऑगस्ट १९०३)

१९२९: वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली - भारतीय पुजारी, निराधारांच्या बहिणीं (Sisters of the Destitute) संस्थेचे संस्थापक (जन्म: ८ ऑगस्ट १८७६)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com