दिनविशेष 6 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 6 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 6 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२०१२: बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसऱ्यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.
२००१: संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९९: विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना युनेस्को गांधी सुवर्णपदक जाहीर.
१९९६: अर्जेंटिनाचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
१९५४: मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
१९१३: दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
१९१२: भारत या पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
१८८८: महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला.
१८६०: अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
आज यांचा जन्म
१९६८: यारी यांग - याहूचे संस्थापक
१९२६: झिग झॅगलर - अमेरिकन लेखक (निधन: २८ नोव्हेंबर २०१२)
१९१५: दिनकर द. पाटील - चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (निधन: २१ मार्च २००५)
१९०१: श्री. के. क्षीरसागर - जेष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत (निधन: २९ एप्रिल १९८०)
१८९०: बळवंत गणेश खापर्डे - कविभूषण
१८८०: योशूसुका अकावा - निसान मोटर कंपनीचे संस्थापक (निधन: १३ फेब्रुवारी १९६७)
१८६१: जेम्स नास्मिथ - बास्केटबॉल खेळाचे निर्माते (निधन: २८ नोव्हेंबर १९३९)
१८५१: चार्ल्स डो - डो जोन्स एंड कंपनीचे सहसंस्थापक (निधन: ४ डिसेंबर १९०२)
१८३९: भगवादास इंद्रजी - प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
१८१४: अडॉल्फ सॅक्स - सॅक्सोफोन वाद्याचे जनक (निधन: ४ फेब्रुवारी १८९४)
१५५०: करिन मॅन्सडॉटर - स्वीडनची राणी (निधन: १३ सप्टेंबर १६१२)
आज यांची पुण्यतिथी
२०१३: तरला दलाल - (जन्म: ३ जुन १९३६)
२०१०: सिद्धार्थ शंकर रे - पश्चिम बंगालचे ६वे मुख्यमंत्री (जन्म: २० ऑक्टोबर १९२०)
२००२: वसंत कृष्ण वैद्य - स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे
१९९८: अनंतराव कुलकर्णी - कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संस्थापक (जन्म: १९ सप्टेंबर १९१७)
१९९२: जयराम शिलेदार - गंधर्व भूषण (जन्म: ६ डिसेंबर १९१६)