दिनविशेष 8 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 8 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published on

Dinvishesh 8 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 8 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१६: इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.

२००४: ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.

१९८५: सार्क परिषदेची स्थापना.

१९७१: भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.

१९५५: युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.

१९४१: दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, फिलीपाईन्स व डच ईस्ट इंडिजवर हल्ला केला.

१९३७: भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.

१७४०: दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.

आज यांचा जन्म

१९८२: मिताली राज - भारतीय क्रिकेटपटू, आणि सगळ्यात जास्त रनस् करणाऱ्या - पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुना पुरस्कार

१९४४: शर्मिला टागोर - भारतीय अभिनेत्री - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

१९४२: हेमंत कानिटकर - भारतीय क्रिकेटपटू

१९३५: धर्मेंद्र - भारतीय अभिनेते, राजकीय नेते - पद्म भूषण

१९००: उदय शंकर - भारतीय नर्तक व नृत्यदिगदर्शक - पद्म विभूषण (निधन: २६ सप्टेंबर १९७७)

१८९७: पं. बाळकृष्ण शर्मा - हिंदी कवी (निधन: २९ एप्रिल १९६०)

१७२०: नानासाहेब पेशवा - मराठा साम्राज्याचे ८वे पेशवा (निधन: २३ जून १७६१)

आज यांची पुण्यतिथी

२०१६: जॉन ग्लेन - अमेरिकन मरीन कॉर्प्स एव्हिएटर, अंतराळवीर, पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारे पहिले अमेरिकन व्यक्ती (जन्म: १८ जुलै १९२१)

२०१३: जॉन कॉर्नफॉथ - ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९१७)

१९७८: गोल्डा मायर - इस्रायलच्या ४थ्या व पहिल्या महिला पंतप्रधान (जन्म: ३ मे १८९८)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com