दिनविशेष 9 डिसेंबर 2023 : महाराणी ताराबाई भोसले यांची पुण्यातिथी
Dinvishesh 9 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 9 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन
१९९५: बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.
१९७१: संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९६६: बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९६१: पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.
१९४६: दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
१९००: अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.
१७५३: थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला
आज यांचा जन्म
१९८१: दिया मिर्झा - अभिनेत्री
१९४६: सोनिया गांधी - कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा
१९४५: शत्रुघ्न सिन्हा - चित्रपट अभिनेते आणि खासदार
१९२९: रघुवीर सहाय - भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक (निधन: ३० डिसेंबर १९९०)
१९१९: ई. के. नयनार - केरळचे ९वे मुख्यमंत्री (निधन: १९ मे २००४)
१८७८: अण्णासाहेब लठ्ठे - कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (निधन: १६ मे १९५०)
१८७०: आयडा एस. स्कडर - भारतीय डॉक्टर आणि मिशनरी (निधन: २३ मे १९६०)
आज यांची पुण्यतिथी
१९९७: के. शिवराम कारंथ - भारतीय कन्नड लेखक, चित्रपट निर्माते आणि विचारवंत - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: १० ऑक्टोबर १९०२)
१९९३: स्नेहप्रभा प्रधान - चित्रपट अभिनेत्री
१७६१: महाराणी ताराबाई भोसले - मराठा साम्राज्याच्या महाराणी (जन्म: १४ एप्रिल १६७५)