दिनविशेष 9 ऑक्टोबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 9 ऑक्टोबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
shweta walge
Published on

Dinvishesh 9 October 2023 : सध्या ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 9 ऑक्टोबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००७: २००८ आर्थिक मंदी - डाऊ जोन्स औद्योगिक सरासरीने १४,१६४पॉइंट्सच्या सर्वकालीन उच्चांक गाठला, त्यानंतर लावकरच २००८ ची आर्थिक मंदी येणार होती.

२००६: उत्तर कोरिया - देशाने पहिली आण्विक चाचणी घेतली.

१९८६: द फॅंटम ऑफ द ऑपेरा - लंडनमधील दुसरे सर्वात जास्त काळ चालणारे संगीत, सुरु झाले.

१९७०: भारतीय वायू सेना - भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द.

१९६७: अर्नेस्टो 'चे' गुएवारा - पकडल्याच्या एका दिवसानंतर, बोलिव्हियामध्ये क्रांती भडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फाशी देण्यात आली.

१९६३: इटली भूस्खलन दुर्घटना - मोठ्या भूस्खलनामुळे वाजोंट धरणाच्या वरून लाट आली आणि किमान २ हजार लोकांचे निधन.

१९६२: युगांडा - स्वतंत्र राष्ट्रकुल क्षेत्र बनले.

१९४६: भारतीय परराष्ट्र सेवा (Indian Foreign Serives, IFS) - सुरवात.

१९३६: हूवर डॅम - मधून वीज निर्मिती करण्यास सुरवात.

१९१४: पहिले महायुद्ध - अँटवर्पचा वेढा संपला.

१८७४: युनिव्हर्सल पोस्टल युनियन - बर्नच्या कराराद्वारे तयार करण्यात आले.

१८७३: यू.एस. नेव्हल इन्स्टिट्यूट - स्थापना झाली.

१८४७: स्वीडिश वसाहतीत गुलामगिरी - संपुष्टात आली.

१८२०: ग्वायाकिल - देशाने स्पेनपासून स्वातंत्र्य घोषित केले.

१७९०: उत्तर अल्जेरिया भूकंप - या भूकंपामुळे भूमध्य समुद्रात निर्माण झालेल्या त्सुनामी मुले किमान तीन हजार लोकांचे निधन.

१७६०: सात वर्षांचे युद्ध - रशियन आणि ऑस्ट्रियन सैन्याने बर्लिनवर कब्जा केला.

१७४०: बटाव्हिया हत्याकांड - डच वसाहतवादी आणि जावानीज मूळ लोकांनी बटाव्हियामधील वांशिक चिनी नागरिकांची हत्या करण्यास सुरवात केली, त्यात किमान १० हज़ात लोकांची हत्या.

१७०१: येल युनिव्हर्सिटी, अमेरिका - सुरुवात.

१६०४: केपलरचा सुपरनोव्हा - हा आकाशगंगेमध्ये पाहण्यात आलेला सर्वात अलीकडील सुपरनोव्हा आहे.

१४४६: हंगुल वर्णमाला - कोरिया मध्ये प्रकाशित झाली.

१४१०: प्राग खगोलीय घड्याळ - प्रथम उल्लेख करण्यात आला.

आज यांचा जन्म


१९६८: अंबुमणी रामदोस - भारतीय राजकारणी, खासदार

१९६६: डेव्हिड कॅमरुन - इंग्लंडचे पंतप्रधान

१९६६: क्रिस्टोफर ओस्टलंड - स्वीडिश उद्योजक, प्लाझा मॅगझीनचे संस्थापक

१९४५: अमजद अली खान - भारतीय शास्त्रीय सरोद वादक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री

१९२४: इमानुवेल देवेन्द्रर - भारतीय सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, नागरी हक्क कार्यकर्ते (निधन: ११ सप्टेंबर १९५७)

१९०६: लेओपोल्ड सेडर सेघोर - सेनेगल देशाचे पहिले राष्ट्रपती (निधन: २० डिसेंबर २००१)

१८९७: एम. भक्तवत्सलम - भारतीय राजकारणी, मद्रास राज्यचे ४थे मुख्यमंत्री (निधन: १३ फेब्रुवारी १९८७)

१८७७: गोपबंधु दास - भारतीय समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी (निधन: १७ जून १९२८)

१८७६: पंडित धर्मानंद कोसंबी - भारतीय बौद्ध धर्माचे अभ्यासक (निधन: ४ जून १९४७)

१८५२: एमिल फिशर - जर्मन रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: १५ जुलै १९१९)

१७५७: चार्ल्स (दहावा) - फ्रान्सचा राजा (निधन: ६ नोव्हेंबर १८३६)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: टेमसुला एओ - भारतीय कवी आणि लेखक (जन्म: २५ ऑक्टोबर १९४५)

२०२२: भंवरलाल शर्मा - भारतीय राजकारणी, राजस्थानचे आमदार (जन्म: १७ एप्रिल १९४५)

२०१५: रवींद्र जैन - भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक - पद्मश्री (जन्म: २८ फेब्रुवारी १९४४)

२०१३: श्रीहरी - भारतीय अभिनेते (जन्म: १५ ऑगस्ट १९६४)

२००६: कांशी राम - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: १५ मार्च १९३४)

२०००: कर्नल पॅट्रिक अँथनी पोर्टिअस - भारतीय-स्कॉटिश सैनिक - व्हिक्टोरिया क्रॉस (जन्म: १ जानेवारी १९१८)

१९९९: नूतन पेंढारकर - भारतीय रंगभूमी अभिनेते

१९९८: जयवंत पाठारे - भारतीय छायालेखक (Cinematographer)

१९८७: गुरू गोपीनाथ - भारतीय कथकली नर्तक (जन्म: २४ जून १९०८)

१९६७: चे गुएवारा - क्युबन क्रांतिकारी (जन्म: १४ जून १९२८)

१९५५: गोविंदराव टेंबे - भारतीय संगीतकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक (जन्म: ५ जून १८८१)

१९१४: विनायक कोंडदेव ओक - भारतीय बालवाङ्‌मयकार (जन्म: २५ फेब्रुवारी १८४०)

१८९२: गोपाळ हरी देशमुख - भारतीय पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार (जन्म: १८ फेब्रुवारी १८२३)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com