Diwali 2023 : तुमच्या प्रियजनांची 'या' शुभेच्छांनी दिवाळी करा खास
Diwali 2023 : अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. या दिवाळीनिमीत्त आपल्या नातेवाईकांना, मित्र मैत्रींणीना शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश.
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण.
!! शुभ दिवाळी !!
आकाशकंदील अन पणत्यांची रोषणाई,
फराळाची लज्जत न्यारी,
नव्या नवलाईची ही दिवाळी,
झगमगली दुनिया सारी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा-पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास.
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा
सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली.
!! शुभ दिवाळी !!